ETV Bharat / state

कोट्यवधी जनता पुराने त्रस्त, मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेत मस्त - नवाब मलिक - अडीच कोटी जनता पुरात अडकली

'राज्यातील अडीच कोटी जनता पुरात अडकली आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिले नाही. ते 'महाजनादेश यात्रेत मस्त आहेत' असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

अडीच कोटी जनता पुरात अडकली असताना मुख्यमंत्री 'मस्तराम' मस्तीत - नवाब मलिक यांचा आरोप
author img

By

Published : Aug 8, 2019, 5:11 PM IST

मुंबई - 'राज्यातील अडीच कोटी जनता पुरात अडकली आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिले नाही. ते महाजनादेश यात्रेत मस्त आहेत' असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

अडीच कोटी जनता पुरात अडकली असताना मुख्यमंत्री 'मस्तराम' मस्तीत - नवाब मलिक

मलिक पुढे म्हणाले, आम्ही परिस्थिती सांगितल्यानंतर तिकडे जाण्याऐवजी मुख्यमंत्री मुंबईत भूखंड कोणाला द्यायचा, याचा निर्णय घेत बसले. आज ते कोल्हापूरला निघाले आहेत. मात्र, त्यांच्याच दिमतीला हजारो अधिकारी, कर्मचारी लागले आहेत. यामुळे लोकांच्या अडचणी आणखी वाढतील. सरकारने राजकारण बाजूला ठेवून आपत्ती व्यवस्थापन आणि इतर संबंधित यंत्रणेची मदत तत्काळ लोकांना मिळवून द्यावी, अशी मागणीही मलिक यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांना देणार-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार, खासदारांनी एका महिन्याचे वेतन पुरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मलिक यांनी सांगितले. या शिवाय इस्लामपूर येथील शिबिरात ७२ हजार लोकांना मदत केली जात आहे. तर, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपयुक्त सामानाचा पहिला ट्रक उद्या सकाळी पाठवला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Intro:अडीच कोटी जनता पुरात अडकली असताना मुख्यमंत्री 'मस्तराम' मस्तीत आहेत - नवाब मलिक यांचा आरोप
mh-mum-01-flood-ncp-navabmalik-byte-7201153
(मोजोवर बाईट पाठवला आहे)
मुंबई, ता. ८ :
राज्यातील अडीच कोटी जनता ही पुरात अडकली आहे, मागील आठ दिवसांत ही परिस्थिती गंभीर बनली असताना आत्तापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे ते 'मस्तराम' मस्तीत आहेत, आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
राज्यात आठ दिवस पुर परिस्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झोपा काढत होते, आम्ही परिस्थिती सांगितल्यानंतर तिकडे जाण्याऐवजी ते मुंबईत काल भूखंड कोणाला द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट घेत बसले. आज ते तिकडे निघाले असल्याने आता त्यांच्या दिमतीला हजारो अधिकारी कर्मचारी यांच्या सेवेत लागलेत, यामुळे लोकांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
आमच्या पक्षाच्या आमदार, खासदारांनी एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला. शिबिर लावले त्यात आम्ही इस्लामपूर येथे ७२ हजार लोकांना मदत करतोय. आम्ही उद्या पूरग्रस्तांच्या मदतीचा पहिला ट्रॅक उद्या सकाळी पाठवत असून इतरही मदत आमची सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांना या पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन यांना नियोजन करता आला नाही हे कर्नाटकच्या त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी यावर निर्णय घेतला नाही.हजारो लोक अडकले असताना काही बोटी या मदतीसाठी असल्याने त्यामुळे अधिक लोकांना दिलासा देता आला नसल्याचा आरोपही मलिक यांनी केला. सरकारने राजकारण बाजूला ठेवून आपत्ती व्यवस्थापन आणि इतर संबंधित यंत्रणेची तात्काळ लोकांना मदत मिळवून द्यावी अशी मागणीही मलिक यांनी यावेळी केली. यासाठी सत्तेचा माज सोडून लोकांच्या मदतीसाठी सरकारने वागावे आणि सगळया विरोधकांना बोलवावे पण राज्यातील लोकांना मदत करावे अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यातल्या आठ जिल्ह्यांत पुराची परिस्थिती गंभीर बनली आहे, आम्ही त्यासाठी सांगत असतानाही ते आठ दिवस हे झोपले होते, आम्ही बोलल्यावर हे लोक आमच्यावर आरोप करतात म्हणून सांगतात. मात्र आता आर्मी नेव्ही आणि राजकारण बाजूला ठेवून विरोधकांनी बोलवावे आणि राज्यातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणीही मलिक यांनी केली.
Body:अडीच कोटी जनता पुरात अडकली असताना मुख्यमंत्री 'मस्तराम' मस्तीत आहेत - नवाब मलिक यांचा आरोप
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.