ETV Bharat / state

Eknath Shinde on Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ' पंतप्रधानांचा अपमान हा...'

विधानसभा आवारात सर्व आमदारांनी शिस्तीचे पालन केलेच पाहिजे याबाबत दुमत नाही. मात्र, पंतप्रधानांचा अपमान आम्हीच काय जनता देखील सहन करणार नाही. सर्व पक्षाच्या आमदारांनी तारतम्य बाळगायला पाहिजे. जर कारवाई करायची असेल तर ती सर्वांवर करा, असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात दिले. राहुल गांधीविरोधातील आंदोलनावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Ekanth Shinde on Rahul Gandhi
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Mar 24, 2023, 4:02 PM IST

Updated : Mar 24, 2023, 4:14 PM IST

मुंबई : विधिमंडळाच्या आवारात गुरुवारी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी राहुल गांधी यांना जोडे मारा आंदोलन केले. अशा पद्धतीने राष्ट्रीय नेत्याचा अपमान करणे विधिमंडळाच्या आवारात आमदारांना शोभत नाही जर असे असेल तर त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनाही अशा प्रकारच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा विरोधी पक्षातील नेत्यांनी दिला होता.

विरोधकांची कारवाईची मागणी : यासंदर्भात आज सभागृह सुरू होताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या गोष्टीचा निषेध करीत ज्यांनी आंदोलन केले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सभागृहात केली. पटोलेंच्या मागणीनंतर सभागृहात दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू झाली. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही गोंधळ सुरू केल्याने सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले या कामकाजात प्रश्नोत्तराचा तासही झाला नाही. अखेर, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात येऊन उत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांनी दिले प्रत्युत्तर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदर्भात सांगितले की, गुरुवारी सभागृहाच्या आवारात जे जोडे मारण्याचे आंदोलन झाले त्याचे आम्ही कधीही समर्थन केले नाही, करणार नाही, सावरकर यांच्या बद्दल अशा पद्धतीचे अनुद्गार काढणे, तोही देशद्रोह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाची कीर्ती जगात पसरवली आहे. या देशाचा मान आणि देशाची कीर्ती जगभर पोहोचवणाऱ्या पंतप्रधानांचा अपमान करणे ही निश्चितच निंदनीय बाब आहे.

जनता देखील सहन करणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, याप्रकरणी समर्थन होऊ शकत नाही. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आम्हीच काय पण ही जनता ही सहन करणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. राहुल गांधी भारताच्या बाहेर जाऊन भारतात लोकशाही धोक्यात असल्याची वक्तव्य करतात. जर लोकशाही धोक्यात असती तर भारत जोडो यात्रा कशी काढली, असा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी हा प्रश्न उपस्थित केला. इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या आणि आम्ही त्यांचाही अभिमान बाळगतो. मात्र, अशा पद्धतीने कुठल्याही नेत्याचा अनादर करणे योग्य नाही. आठ महिने तुम्ही आमच्या विरोधात घोषणा दिल्या, त्या संदर्भात आम्ही कधीही काहीही बोललो नाही.

सर्वांवर कारवाई झाली पाहिजे : जर कारवाई करायचीच असेल तर ती सगळ्यांवर झाली पाहिजे. गेले आठ महिने खोके बोलता मुख्यमंत्र्यांबद्दल काहीही बोलता ते आम्ही सहन करतोय ना? असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. तसेच जर कारवाईच व्हायची असेल तर ती सर्वांवर झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Rahul Gandhi Disqualified: राहुल गांधींची खासदारकी रद्द, २ वर्षांची शिक्षा झाल्याने मोठा झटका

Last Updated : Mar 24, 2023, 4:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.