ETV Bharat / state

Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायतीत घवघवीत यश; महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया - Hasan Mushrif

Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालंय. तर या ग्रामपंचायतीमध्ये महायुती म्हणजे शिंदे गट, भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांनी मिळून सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया (CM Eknath Shinde Reaction) दिली आहे.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 7:29 PM IST

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई Gram Panchayat Election Result : रविवारी राज्यातील अनेक ग्रामपंचायतीचे मतदान झाले होते. त्याचा आज निकाल लागला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये काही नेत्यांच्या पॅनेलला पराभवाचा सामना करावा लागला. तर या ग्रामपंचायतीमध्ये महायुती म्हणजे शिंदे गट, भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांनी मिळून सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये अनेकांनी बाजी मारली आहे. तर अनेकांना धक्का बसला आहे. कोकणात मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला आहे. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या पॅनेलला आमदार आबिटकर यांनी धक्का देत विजय मिळवला आहे. दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायत निकालावर राजकीय पक्षाकडून प्रतिक्रिया येत असताना, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे.

ज्यांनी मतदारांशी बेईमानी केली त्यांना घरी बसवलं : निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आम्हाला ज्या मतदारांनी कौल दिला आहे, मी त्या मतदारांचे मनापासून आभार मानतो. मागील एक वर्षापासून आम्ही केलेली कामं लोकांनी पाहिली. महाविकास आघाडीच्या काळात जी रखडवलेली कामं होती, त्यांना आम्ही चालना दिली आहे. शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यापर्यंत सर्वांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं. खऱ्या अर्थाने सरकार आपल्या दारी पोहचलं आहे. मविआपेक्षा कितीतरी पटीनं महायुतीच्या जागा अधिक विजयी झाल्या आहेत. आमच्या सरकारमधील सर्वांनी लोकाभिमुख काम करण्याचं काम केलं. त्यामुळं हा मतदारांनी कौल दिला आहे. तसंच ज्या लोकांनी मतदारांशी बेईमानी केली, बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली, त्या लोकांना मतदारांनी नाकारलं, घरी बसवलं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला.

ग्रामपंचायत निवडणूक निकाल -२०२३, ४ वाजेपर्यंतची आकडेवारी

भाजपा –665

शिंदे गट - 239

ठाकरे गट -108

काँग्रेस - 185

शरद पवार गट - 180

अजित पवार गट - 358

महायुती - 1263

महाविकास आघाडी - 473

खऱ्या अर्थाने सरकार आपल्या दारी पोहचले आहे. मविआपेक्षा कितीतरी पटीने महायुतीच्या जागा अधिक विजयी झाल्या आहेत. आमच्या सरकारमधील सर्वांनी लोकाभिमुख काम करण्याचं काम केलं. त्यामुळं हा मतदारांनी कौल दिला आहे. तसंच ज्या लोकांनी मतदारांशी बेईमानी केली, बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली, त्या लोकांना मतदारांनी नाकारलं, घरी बसवलं असं म्हणत ठाकरे गटाला टोला लगावला. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आमची अधिक जबाबदारी वाढलीय : पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांनी फक्त टोमणे, आरोप, प्रत्यारोप एवढंच काम केलं, त्यांना मतदारांनी नाकारलं. ज्यांच्या दिवसाची सुरुवात टीका आणि आरोप करुन होते, त्यांच्याबाबत हा कौल लोकांनी दिला आहे. मतदारांचं आमच्यावर प्रेम आणि विश्वास आहे. सर्वांना मी धन्यवाद देतो. या विजयामुळं आमची अधिक जबाबदारी वाढली आहे. अधिक कामं करुन तरुणांच्या हाताला काम देऊ. तसंच सर्व समाजाने सर्व घटकातील लोकांनी आम्हाला पाठबळ दिलं. पाठिंबा दिला आशीर्वाद दिला, म्हणून हे शक्य झालं. मागील अडीच वर्षातील कामगिरी ही लोकांनी पाहिली आहे. आमच्या विजयाची ही अशीच घौडदौड सुरू राहील. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ पेक्षा अधिक खासदार निवडणूक देऊ आणि मोदींच्या सरकारला पाठबळ देऊ असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.

हेही वाचा -

Gram Panchayat Election 2023: ग्रामपंचायत निवडणुकीतील यश म्हणजे महायुतीच्या कामांचा विजय, शिंदे गटाची प्रतिक्रिया

Gram Panchayat Election : दिलीप वळसे पाटील यांची गड आला पण सिंह गेला अशी अवस्था, गावात सरपंचपदी शिंदे गटाचा उमेदवार विजयी

Gram Panchayat Result २०२३ : ग्रामपंचायत निकालावरुन नाना पटोलेंचा भाजपावर हल्लाबोल; कोण नंबर वन?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.