मुंबई: ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील रुग्णालयात एका रात्रीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून सरकारच्या अनास्थेमुळेच हे घडत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
मुख्यमंत्रीच जबाबदार: अशी घटना एखाद्या दुसऱ्या राज्यात घडली असती तर भाजपने त्या राज्यातील सरकारचा राजीनामा मागितला असता. आता हीच घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. तरीही भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का गप्प आहेत? या नेत्यांना जनतेच्या दुःखाचे काहीही पडलेले नाही. ठाणे शहर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृह जिल्हा आहे. यासाठी आरोग्य यंत्रणे सोबतच राज्य सरकारची अनास्था आणि मुख्यमंत्रीसुद्धा जबाबदार आहे, असा आरोप अंबादास दानवेंनी केला. एकनाथ शिंदे यांच्या कामकाजाचा ठाणे महानगरपालिकेवरती अनेक वर्षांपासून प्रभाव राहिला आहे. त्यामुळे या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.
तर कमळाच्या चिन्हावर लढा: शिंदे गटाचे काही आमदार आता जर आम्हाला चिन्ह मिळाले नाही तर आम्ही कमळावरसुद्धा लढायला तयार आहोत, असे म्हणताना दिसत आहे. वास्तविक शिंदे गटाच्या आमदारांनी कमळाच्या चिन्हावर लढावे, अशीच भाजपची इच्छा आहे. त्याच दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटाचे आमदार कोणत्याही चिन्हावर लढले तरी राज्यातील जनता आणि शिवसैनिक त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी दानवे म्हणाले.
घटना दुर्दैवी पण: ठाण्यातच्या कळव्यात महानगरपालिकेच्या रुग्णालयात काही तासात अनेक रुग्ण दगावले आहेत. ही घटना दुर्दैवी आहे; मात्र ही घटना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात घडली असती तर भाजपने महाराष्ट्र डोकेवर घेतला असता. जी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेचे नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात. त्या मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत असलेल्या रुग्णालयाची ही अवस्था असेल आणि 19 जणांचा नाहक बळी जात असेल तर याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्य खाते जबाबदार आहे. यांना माणसाच्या आरोग्याची चिंता नाही जीवाची तर मुळीच चिंता नाही. म्हणून अशा घटना होत असताना याबाबतीत राज्य सरकारने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत, असा आरोप विधानसभा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.
हेही वाचा: