मुंबई: दरवर्षी मुसळधार पावसात पाणी साचून मुंबई पाण्याखाली जाते. यंदा नालेसफाईत त्रुटी आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिले. मुंबईतील नालेसफाईवर भर देण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या. नालेसफाई कामांची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. दरम्यान, नालेसफाई कामावर टीकास्त्र सोडले.
-
#WATCH | Cleaning of Mithi River is starting today. Officers who do good work will be respected and those who do negligence will be acted upon: Maharashtra Chief Minister Eknath Shinde, Mumbai pic.twitter.com/fEZP6fAMbo
— ANI (@ANI) May 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Cleaning of Mithi River is starting today. Officers who do good work will be respected and those who do negligence will be acted upon: Maharashtra Chief Minister Eknath Shinde, Mumbai pic.twitter.com/fEZP6fAMbo
— ANI (@ANI) May 18, 2023#WATCH | Cleaning of Mithi River is starting today. Officers who do good work will be respected and those who do negligence will be acted upon: Maharashtra Chief Minister Eknath Shinde, Mumbai pic.twitter.com/fEZP6fAMbo
— ANI (@ANI) May 18, 2023
नालेसफाई कामांचा आढावा: मुंबईत दरवर्षी मुसळधार पावसात मुंबईतील सखळ भागात पाणी साचते. रस्ते, रेल्वे वाहतूकीवर याचा मोठा परिणाम होतो. मुंबई मनपाकडून दरवर्षी नालेसफाई केली जाते. कोट्यवधी रुपये त्यावर खर्च केले जातात. मुंबई मनपा नाले सफाई झाल्याचा दावा करतात. पहिल्याच पावसात नालेसफाईचा अनेकदा बोजवारा उडतो. यंदा मुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाळापूर्व नालेसफाई कामांचा आज आढावा घेतला आहे. मिठी नदीपासून या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. मिठी नदीतून काढण्यात आलेल्या गाळाची माहिती मुख्यमंत्र्यांना आयुक्तांनी दिली. कामांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.
नालेसफाई कामांची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली, नालेसफाई कामात गाळ काढण्यात काही त्रुटी राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई: मिठी नदीतून आतापर्यंत किती मेट्रीक टन गाळ काढला. यापेक्षा मशनरी किती खाली जात आहेत, हे महत्वाचे आहे. मुंबईतील नाले किंवा नदीतील खडकापर्यंत मशीन जायला हव्यात. त्या स्वरूपाची नालेसफाई अपेक्षित आहे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या. तसेच नालेसफाई कामात गाळ काढण्यात काही त्रुटी राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
मुंबईला मिठीची मगरमिठी: मुंबईच्या पश्चिम उपनगरातून उगम पावणारी मिठी नदी बांद्रा बिकेसी कुर्ला पर्यंत येते. या विभागात अतिक्रमणामुळे मिठी नदीची रुंदी व लांबी कमी होत गेली. त्यामुळे पिण्यायोग्य असलेल्या मिठी नदीचे अस्तित्व धोक्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदी ओव्हर फ्लो झाली की परिसरातील नागरिकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे लागते. मुंबईत मोठा पाऊस पडला की मिठी नदी परिसरात दरवर्षी एनडੀआरएफला पाचारण करून बचाव मोहीम राबवावी लागते. मिठी नदी ओव्हर फ्लो झाल्यानंतर नदी परिसर जलमय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने मिठी नदीच्या ८ किलोमीटर परिसरात सुरक्षित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -