ETV Bharat / state

Maratha Protest : मराठा आरक्षण प्रश्नी बुधवारी सर्वपक्षीय बैठक; सरकार जरांगे पाटलांना भेटणार नाही - मंत्री उदय सामंत

Maratha Reservation Protest : राज्यात उग्र रुप धारण केलेल्या मराठा आरक्षण आंदोलन प्रश्नी बुधवारी सर्वपक्षीय बैठक राज्य सरकारनं बोलावली (All Party Meeting) आहे. या बैठकीमध्ये आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्याचा सरकारचा विचार असून, हे आंदोलन शांततेत संपवलं पाहिजे असे सरकारचं मत आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांना भेटण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय.

Maratha Reservation Protest
मराठा आरक्षण आंदोलन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 8:35 PM IST

मुंबई Maratha Reservation Protest : राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनानं उग्र रूप धारण केलंय. नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे, तर अनेक नेत्यांची घरे आणि मालमत्ता पेटवण्यात येत आहे आंदोलनाला अतिशय हिंसक वळण लागलं असून, हे आंदोलन लवकरात लवकर शांततेत संपलं पाहिजे यासाठी सरकार तोडगा काढत (All Party Meeting) आहे. सरकारनं मराठवाड्यातील कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा मोठा निर्णय घेतलाय.

सर्वपक्षीय होणार बैठक : बुधवारी राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये सर्व तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांची एक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्वांना सूचना दिल्या जातील, असे राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं. त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरू होईल. त्यामध्ये कोणताही विलंब येणार नाही, अशी ग्वाही सरकारनं दिली आहे.

सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन : मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारनं बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून, या बैठकीला महाविकास आघाडीतील नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलंय. मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथीगृहात सकाळी दहा वाजता ही बैठक सुरू होणार आहे. दरम्यान, महायुतीमधील खासदार आणि आमदारांची विशेष बैठक मंगळवारी संध्याकाळी बोलावण्यात आली. राज्यभर सुरू असलेला उद्रेक शांत करण्यासाठी आणि याबाबतीत सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी बुधवारी बैठक बोलावली आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत यांनी दिली.

जरांगे पाटलांना भेटणार नाही : जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच असून, त्यांना आता वैद्यकीय उपचाराची गरज आहे. सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना वैद्यकीय उपचार करण्याबाबत विनंती करत आहोत. मात्र, त्यांनी अद्यापही विनंती मान्य केलेली नाही त्यामुळे सरकार त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटण्याची कोणतीही परिस्थिती नसल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
  2. Chandrashekhar Bawankule : आरक्षणाची आग उद्धव ठाकरेंनी लावली; तर एकनाथ शिंदे विझवत आहेत - चंद्रशेखर बावनकुळे
  3. Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घराबाहेर सुरक्षेत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.