मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले. तसेच गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामे केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेकडून सांगितले जात असलेला अडीच वर्षांचा निर्णय माझ्यासमोर कधीच झाला नव्हता व तसा शब्दही दिला नसल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजुबाजूची लोकं आमच्यात दरी निर्माण करत असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांचे नाव न घेता लगावला. हंगामी मुख्यमंत्री म्हणून मी जबाबदारी सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार स्थापनेसाठी शिवसेनेने चर्चा थांबवली असून त्यांची भाषा बदलली आहे. आमच्यासोबत चर्चा नाही. मात्र, आघाडीच्या नेत्यांसोबत दिवसातून दोन दोन बैठका केल्या. त्यामुळे ही चर्चा शिवसेनेने थांबवल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील जनतेचे, विरोधी पक्षांसह माध्यमांचे व शिवसेनेचे आभार मानले आहेत.
पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे -
भाजप-सेनेला जोडणारा हिंदुत्वाचा धागा कायम
मतभेद दूर झाल्यास मिळून सत्ता स्थापन करू
अद्याप आमची युती तुटलेली नाही
महायुतीत निवडून आलो, महायुतीची दरवाजे खुली
सरकार स्थापनेसाठी घोडेबाजार करणार नाही
पुन्हा भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार
काळजीवाहू मुख्यमंत्री असल्याने राज्यातील धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही
आमदार पळवापळवीचे विरोधकांचे आरोप खोटे; सिद्ध करा अन्यथा माफी मागा
उद्धव ठाकरेंनी माझा फोन उचलला नाही
मोदींबद्दल अपशब्द वापरणे सहन होणार नाही
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मी काम पाहणार
आमच्याशी चर्चा नाही मात्र, आघाडीशी रोज चर्चा
अडीच वर्षांचा शब्द भाजपच्या वरिष्ठांनीही कधीच दिला नव्हता
शिवसेनेकडून कुठलाही प्रस्ताव नाही
उद्धव ठाकरेंच्या आजुबाजूची लोकं आमच्यात दरी निर्माण करत आहेत
चर्चा शिवसेनेनेच थांबवली आहे
माझ्यासमोर कधीच अडीच वर्षाचा निर्णय झाला नाही