ETV Bharat / state

मला विश्वास, नवीन सरकार लवकरच स्थापन होईल - देवेंद्र फडणवीस - CM devendra fadnavis in delhi

बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाह यांच्यासोबत सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. मात्र, दोघांनीही याबाबत स्पष्ट खुलासा केलेला नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमित शाह बैठक
author img

By

Published : Nov 4, 2019, 12:17 PM IST

Updated : Nov 4, 2019, 1:00 PM IST

मुंबई - नवीन सरकार स्थापनेवर कोण काय बोलले आहे, यावर भाष्य करण्याची इच्छा नाही. तर मला एवढेच सांगायचे आहे, मला विश्वास आहे नवीन सरकार लवकरच स्थापन होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यात आज (सोमवारी) दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत ते राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर केंद्र सरकारने मदत करावी, यासंबंधित ही बैठक झाल्याची माहिती आहे. मात्र, बैठकीत राज्यातील सत्ता स्थापनेबाबत दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा स्पष्ट खुलासा त्यांनी केला नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. नुकतेच राज्य सरकारने 10 हजार कोटीं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर केले आहेत. मात्र, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्याची मागणी केली होती. यासाठी केंद्र सरकारने यात लक्ष घालावे, यासाठी ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून बरेच दिवस झाले आहेत. मात्र, अजून ही भाजप-शिवसेना दोनही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरून तणाव निर्माण झाला आहे. बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाह यांच्यासोबत सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. मात्र, दोघांनीही याबाबत स्पष्ट खुलासा केलेला नाही.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Nov 4, 2019, 1:00 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.