मुंबई - भारतीय जनता पक्षातर्फे आज(ऑक्टोबर) मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे 'दिपावली स्नेह मिलन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येत्या काही दिवसातच युतीचे सरकार स्थापन करणार असून युतीबाबत कोणालाही काही शंका असता कामा नये; सर्व काही युतीत सुरळीत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
हेही वाचा - शिवसेनेसोबत सत्ता स्थापण्याचा सध्या कोणताही विचार नाही - बाळासाहेब थोरात
आघाडीला मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेच्या भूमिकेबाबत चर्चांना उधान आले आहे. या चर्चांना पूर्णविराम देण्याचा एकप्रकारचा प्रयत्न फडणवीस यांनी यावेळी केला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईतून निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित आमदार, मुंबईतील खासदार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.