मुंबई - नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथील खडकी जवळ वाहनाचा अपघात होऊन सहा मजुरांचा मृत्यू झाला. यामध्ये 5 महिलांचाही समावेश आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धडगावमधील हे मजूर होते. अपघातात गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवरही शासन खर्चाने उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री यांनी पालकमंत्री के.सी. पाडवी आणि जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेत मदत करण्याचा सूचना दिल्या.
हेही वाचा - मुलुंडमध्ये जिलेबी फाफडा वाटून बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी, अनेक गुजराती बांधवानंचा शिवसेनेत प्रवेश