मुंबई - जगभरातील लाखो युवा वर्गातील मुले व मुली ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ या आंदोलनात सहभागी होऊन ताबडतोब बिघडत चाललेल्या पर्यावरणावर उपाययोजना करण्यासाठी आग्रही बनली आहेत. यासंदर्भात महाराष्ट्रातही विविध ठिकाणी मुले एकत्र येत आंदोलन करत आहेत. शनिवारी मुंबईतही मुलांनी आंदोलन केले. यावेळी मुलांच्या हातातील फलके सर्वांना विचार करायला लावणारी होती.
हेही वाचा - इतके तापमान ३० लाख वर्षांपूर्वीही नव्हते, संयुक्त राष्ट्र संघटनेचा इशारा
'सिस्टम चेंज, नॉट क्लाईमेट चेंज', 'नो वॉटर लाईफ', 'अब दिल्ली दूर नही AQI २००', पर्यावरण वाचवा, अशी वाक्ये लिहून मुलांनी रेल्वेस्थानकांसह इतर ठिकाणी आंदोलन करत पर्यावरण बदलाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचा निषेध केला. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २०० वर पोहचला आहे. तो असाच वाढत जाणे फार घातक असून २५० वर पोहचल्यास मुंबईकरांच्या आरोग्याला मोठी हानी पोहचणार आहे. त्यामुळे दिल्लीसारखी हवा प्रदूषणाची स्थिती मुंबईत व्हायला वेळ लागणार नाही, याकडे मुलांनी लक्ष वेधले. यंदा बेसुमार पडलेला अवकाळी पाऊस हे पर्यावरण बदलाचाच परिणाम असल्याचे सांगण्यात आले.
-
Week42 of climate strike in #Mumbai
— Fridays for future_Mumbai 🇮🇳 (@fffmumbai1) December 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Students & youth strike for #ClimateJustice #Mumbai's AQI is deteriorating ,& now since a month it's above 200 in very poor category..
The series of non seasonal rainfall still continues to destroy farmers vegetation..#FridaysForFuture pic.twitter.com/Jvx9cQz2IS
">Week42 of climate strike in #Mumbai
— Fridays for future_Mumbai 🇮🇳 (@fffmumbai1) December 21, 2019
Students & youth strike for #ClimateJustice #Mumbai's AQI is deteriorating ,& now since a month it's above 200 in very poor category..
The series of non seasonal rainfall still continues to destroy farmers vegetation..#FridaysForFuture pic.twitter.com/Jvx9cQz2ISWeek42 of climate strike in #Mumbai
— Fridays for future_Mumbai 🇮🇳 (@fffmumbai1) December 21, 2019
Students & youth strike for #ClimateJustice #Mumbai's AQI is deteriorating ,& now since a month it's above 200 in very poor category..
The series of non seasonal rainfall still continues to destroy farmers vegetation..#FridaysForFuture pic.twitter.com/Jvx9cQz2IS
हेही वाचा - 'हवामान बदलाला गांभीर्याने घेतले नाही, तर पृथ्वी सोडायची वेळ तुमच्यावर येईल'
स्वीडनमधील संसदेसमोर ग्रेटा थनबर्ग या अवघ्या १५ वर्षांच्या मुलीने ऑगस्ट २०१८ पासून सुरू केलेल्या पर्यावरण विषयक जनजागृती मोहिमेला आता महाराष्ट्रातही प्रतिसाद मिळू लागला आहे. शाळा, कॉलेजांसह विविध संस्था, संघटनांपर्यंत जाऊन पर्यावरण रक्षणासाठीची जनजागृती करण्यात येत आहे. मुलांनी सुरू केलेली ही जागतिक लोकचळवळ होऊ लागली आहे.
ग्लोबल वार्मिंग अर्थात पर्यावरण बदलाविषयी उपाययोजना करण्यासाठी मानवाच्या हातात फक्त पाच ते जास्तीत जास्त दहा वर्षे आहेत, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग या १५ वर्षाच्या मुलीने पर्यावरण विषयक जनजागृती मोहीम सुरू केली. गेल्यावर्षी ऑगस्ट २०१८ मध्ये ती सलग ३ आठवडे एकटीच स्वीडन संसदेसमोर जाऊन बसत होती. पर्यावरण समस्येवर ठोस काहीच उपाय केले जात नाहीत. यामुळे अस्वस्थ झालेल्या ग्रेटाने खासदारांना निवेदने दिली. नंतर दर शुक्रवारी तिने शाळाबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात केवळ ११ महिन्यांत १३१ देशांतील २० लाखांहून अधिक मुले सहभागी झाली.
-
#week41 #ClimateStrike in #Mumbai for #ClimateAction
— Fridays for future_Mumbai 🇮🇳 (@fffmumbai1) December 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Non seasonal rainfall continue to haunt #India ,huge destruction of farmer's crops reported,but at the same time 130K trees were felled in #Odisha's #Talibara for a coal mine.#SaveTalabira #FridaysForFuture @moefcc pic.twitter.com/dTJifvbEnW
">#week41 #ClimateStrike in #Mumbai for #ClimateAction
— Fridays for future_Mumbai 🇮🇳 (@fffmumbai1) December 13, 2019
Non seasonal rainfall continue to haunt #India ,huge destruction of farmer's crops reported,but at the same time 130K trees were felled in #Odisha's #Talibara for a coal mine.#SaveTalabira #FridaysForFuture @moefcc pic.twitter.com/dTJifvbEnW#week41 #ClimateStrike in #Mumbai for #ClimateAction