मुंबई - संपूर्ण जगात पर्यावरण ( Environment ) हा सध्या महत्त्वाचा विषय आहे. स्वच्छता, ही आपली संस्कृती ( Culture ) झाली पाहिजे, असं मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी व्यक्त केलं आहे. जागतिक जागतिक पर्यावरण दिनाच्या ( World Environment Day ) निमित्ताने मुंबईत झालेल्या माझी वसुंधरा २ अवॉर्डस २०२२ या कार्यक्रमात ते बोलत होते.
आदित्य ठाकरे मनाने निर्मळ माणूस - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण विभागातर्फे माझी वसुंधरा २ अवॉर्डस २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये राज्यभरातील विविध मान्यवरांना पर्यावरण क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्काराने गौरवण्यात आलं. याप्रसंगी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आज रविवारचा दिवस असून सुद्धा आम्ही आमचे कार्यक्रम रद्द करून या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाला उपस्थित झालो.
आदित्य ठाकरे यांचा पर्यावरण विभाग अडीच वर्षापासून खूप चांगले काम करत आहे. पर्यावरण हा खूप महत्त्वाचा विषय असून महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे व त्यांची टीम या विभागासाठी फार छान काम करत आहे. या कामाचं फळ आज दिसून आलं. त्याचबरोबर स्वच्छता ही आपली संस्कृती झाली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. करोनामध्ये सर्वच विभागांनी फार छान काम केलं आहे. त्यासाठी त्या विभागातील अधिकारी त्याचबरोबर त्या लोकांचा सत्कार होत आहे. ही फार आनंदाची बाब आहे. आदित्य मनाने खूप निर्मळ माणूस असून महाराष्ट्रामध्ये जिव्हाळ्याचं नातं निर्माण करण्याचे काम आदित्य ठाकरे करत आहे, असेही थोरात म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी मानले आभार - याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यांनी ज्यांनी या कामासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर विकासाचं भूत इतकी वर्ष मानगुटीवर बसलं होतं. काही गोष्टी अशा असतात की त्या वारंवार सांगाव्या लागतात. निसर्गाकडे आपले दुर्लक्ष होत आहे. टीवरीची कत्तल मोठ्या प्रमाणात केली जात आहे. ती वाचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. करोनामध्ये पक्षी रस्त्यावर दिसले. ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची कत्तल केली जात आहे. आपणाला विकास हवा आहे व पर्यावरण सुद्धा, त्या दृष्टिकोनातून आम्ही पावले टाकायला सुरुवात केली आहे. सध्याचा पाऊस हा आयपीएल सारखा पडणार असं वाटतं. विकासाच्या नावाने जे काही पाप केले आहे त्याची भरपाई लवकर होणार नाही. शाश्वत विकास फार महत्वाचा असून काहींचे भोंगे वेगळे असतात, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा -World Environment Day 2022: जागतिक पर्यावरण दिन; वाचा सविस्तर
हेही वाचा - Today Vegetable Prices: भाजीपाल्याचे भाव कडाडले; मान्सूनपूर्व पावसाचा फटका