मुंबई : स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी (Telgi Stamp Paper Scam) तेलगी स्वर सोनी चैनलच्या वतीने वेब सिरीज (web series on Telgi) तयार करण्यात येत आहे. या विरोधात तेलगीच्या मुलीने मुंबई दिवाणी न्यायालयात (Mumbai Civil Court) धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी पूर्ण होण्यापूर्वी अंतिम बंदी करिता केलेला अर्ज फेटाळून लावला आहे. ही वेब सिरीज 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तेलगीच्या जीवनावर आधारित असलेल्या या वेब सिरीज मध्ये तेलगी संदर्भात आणि की काय खुलासे करण्यात येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तेलगी यांच्या मुलीने दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, ज्या पुस्तकाच्या आधारे वर वेब सिरीज बनत आहे त्या पुस्तकावरील अनेक माहिती चुकीची आहे जर ही वेब सिरीज प्रदर्शित (Telgi Web Series Exhibition) झाली तर कुटुंब यांची मोठी बदनामी होण्याची शक्यता आहे. या सविस्तर याचिकेवर प्रतिवाद्यांना 13 जानेवारी पर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानंतर या याचिकेवर सविस्तर सुनावणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत या या याचिकेवर पूर्ण सुनावणी होत नाही. तोपर्यंत बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे प्रतिवाद्यांना या वेब सिरीज वर जाहिरात आणि इतर कोणत्याही कामावर बंदी घालण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात : बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर वेब सिरीज येता 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होती. या विरोधात तेलगीची मुलगी सना इरफान तालिकोटी हिने विरोध दर्शवत निर्माता यांनी आमची कुठलीही परवानगी घेतलेली नाही. तसेच या पुस्तकाच्या आधारावर वेब सिरीज तयार करण्यात आली आहे. त्या पुस्तकातील माहिती संपूर्ण खोटी असल्याचे देखील युक्तिवाद वकील माधव थोरात यांनी आज कोर्टासमोर केला. बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगीची मुलगी सना इरफान तालिकोटी हिने त्याच्या जीवनावर आधारित वेब सीरिजच्या निर्मात्यांविरुद्ध शहर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. स्टॅम्प पेपर घोटाळा 2003 मधील मुख्य दोषी आरोपी अब्दुल करीम लाला यांच्या संबंधित येणाऱ्या वेब सिरीज प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. या वेब सिरीज च्या प्रदर्शनापूर्वी मुख्य आरोपी तेलगी च्या कुटुंबीयांची परवानगी घेण्यात आली नाही असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे या वेब सिरीज ला प्रदर्शित करण्यापासून थांबवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रतिष्ठेचे नुकसान होत असल्याचा दावा : या प्रमुख प्रकरणातील आरोपी तेलगीच्या कुटुंबीयांनी मुंबई शहर दिवाणी न्यायालयात अॅपलॉज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक हंसल मेहता, सरव्यवस्थापक प्रसून गर्ग आणि सोनी लिव्ह यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या गुरुवार रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सना इरफान तालिकोटी आरोप केला आहे की कादंबरीवर आधारित आमच्या वडिलांच्या व्यक्तिरेखेचे चित्रण खोटे, निराधार, अपमानास्पद, आक्षेपार्ह, अप्रिय, अत्यंत बदनामीकारक आहे. आमची, आमच्या कुटुंबाची आणि आमच्या मृत वडिलांची बदनामी करण्याच्या उद्देशाने केले गेले आहे. त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल असे म्हटले आहे. याचिककर्ती सना इरफान तालिकोटी पुढे म्हणाली की वेब सीरिजमुळे तिच्या अल्पवयीन मुलांचेही नुकसान होईल. तिने सांगितले की तिच्या वडिलांनी अनेक सामाजिक कारणांसाठी बराच वेळ, पैसा खर्च केला होता पाण्याच्या टाक्या, बोअरवेल, मंदिरे आणि मशिदी बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. त्यांनी अनेक गरीब मुलांचे शैक्षणिक कर्ज देखील केले होते असे म्हटले आहे.
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस : स्टॅम्प पेपर घोटाळ्या मधील भूमिकेसाठी 30 वर्षांची शिक्षा भोगत असताना 56 वर्षीय तेलगीचा ऑक्टोबर 2017 मध्ये बेंगळुरूच्या रुग्णालयात मृत्यू झाला. 1993 ते 2002 दरम्यान त्याने नाशिकमधील सरकारी सुरक्षा मुद्रणालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बनावट स्टॅम्प पेपर छापण्यासाठी सरकारी लिलावात मशिनरी खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने बँका, विमा आणि स्टॉक ब्रोकरेज फर्म्स यांसारख्या मोठ्या खरेदीदारांना सवलतीत विकले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी तेलगीला 22 नोव्हेंबर 2001 रोजी बेंगळुरू येथे अटक करण्यात आली होती. तेलगीच्या अटकेनंतर शेकडो कोटी रुपयांचा हा घोटाळा उघड झाला. त्यानंतरच्या तपासात त्याचे अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे उघड झाले होते. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे देखील नाव तेलगी सोबत त्यावेळी जोडले गेले होते. महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये तेलगीवर सुमारे 48 गुन्हे दाखल आहे. ज्यात पुण्यातील बंड गार्डन पोलिस स्टेशनमधील सर्वात हायप्रोफाइल प्रकरणाचा समावेश होता. ज्यामध्ये पोलिसांनी 500 कोटींचे स्टॅम्प पेपर जप्त केले होते. सीबीआयने नंतर सर्व प्रकरणे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत विशेष मकोका कोर्टात एकत्र केली होते.
सविस्तर ऑर्डर आलेली नाही : तेलगीच्या मुलीचे वकील माधव थोरात यांनी म्हटले की, न्यायालयाने आम्ही केलेले केलेला अंतरिम दिलासाचा अर्ज फेटाळला आहे. मात्र तरी देखील वेब सिरीज प्रदर्शित होणे नाही. कारण की युक्तीवादा दरम्यान प्रतिवादी यांच्या वकिलांनी असे म्हटले होते. मात्र अद्याप सविस्तर ऑर्डर आली नसल्याने यावर अधिक काही बोलू शकत नाही, असे वकील माधव थोरात यांनी म्हटले आहे.