ETV Bharat / state

'जनता कर्फ्यू'ला मुंबईकरांचा प्रतिसाद, 'सीएसएमटी' स्थानकावर सुरक्षा व्यवस्था कडक - कोरोना विषाणू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद देत मुंबईकरांनी घराबाहेर न पडणे पसंत केले आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रविवारी जी गर्दी पाहायला मिळते, ती आज पाहायला मिळत नाही.

Mumbai
'जनता कर्फ्यू'ला मुंबईकरांचा प्रतिसाद
author img

By

Published : Mar 22, 2020, 7:38 AM IST

मुंबई - देशामध्ये कोरोना बाधीत रुग्णाची वाढती संख्या पाहून, त्यावर आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत केले होते. त्यानुसार त्यांनी आज सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांनी स्वतःहून, स्वतःसाठी संचारबंदी लागू करावी असे, आवाहन केले होते. त्यासाठी त्यांनी 'जनता कर्फ्यू' हा नवा शब्द वापरला आहे.

सीएसएमटी स्थानकावर सुरक्षा व्यवस्था कडक

हेही वाचा - कहर कोरोनाचा: आता फक्त 'हे' प्रवासी करतील लोकलने प्रवास; सरकारचा महत्त्वाचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद देत मुंबईकरांनी घराबाहेर न पडणे पसंत केले आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रविवारी जी गर्दी पाहायला मिळते, ती आज पाहायला मिळत नाही. रेल्वेस्थानकावर कोरोना विषाणू संदर्भात माहिती देणारी ध्वनिफीत लावण्यात आलेली आहे. याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर असलेली सुरक्षा व्यवस्थासुद्धा वाढवण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून जाणारा सब वे बंद करण्यात आलेला असून केवळ रात्रपाळी करून जाणाऱ्या नागरिकांना त्यांना घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर सोडण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सुरक्षित राहावे, असे जीआरपी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - मुंबईतील राष्ट्रवादीचे कार्यालय 31 मार्चपर्यंत बंद रहाणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.