ETV Bharat / state

Mumbai News: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वसामान्यांच्या 'या' आहेत प्रतिक्रिया

author img

By

Published : Feb 19, 2023, 11:25 AM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या मनामनात रुजवलेले शिवसेना हे पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालामुळे ठाकरे यांच्या हातून निसटले आहे. आयोगाच्या निर्णयाने उद्धव ठाकरे यांना धक्का दिला असला, तरी सर्वसामान्य नागरिक देखील अचंबित झाले आहेत.

Mumbai News
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वसामान्यांना काय वाटतं

मुंबई : शिवसेना कोणाची? हा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात सुरू होता. आयोगाने यावर निर्णय देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून कागदपत्रे मागवून घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदारांसह लाखोंच्या संख्येने पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र पाठवली होती. दरम्यान, विधानसभा आणि लोकसभेतील सदस्य संख्येनुसार आयोगाने निर्णय द्यावा, अशी शिंदे गटाची मागणी होती. अखेर, निवडणूक आयोगाने यावर शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. यावर सगळीकडून प्रतिक्रिया येत आहे. या निर्णयाचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांवर देखील होत आहे. ईटीव्ही भारतने काही सर्वसामान्य नागरिकांसोबत संवाद साधला. त्यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह : या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. भाजपने मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने आलेल्या निकालाचे स्वागत करत उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही ठाकरेंना टार्गेट केले जात आहे. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या बाजूने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हे वाद सुरू असले तरी सर्वसामान्यांना देखील निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नसल्याचे दिसून येत आहे.

आपल्या घरावर बाहेरच्या व्यक्तीचा दावा : निवडणूक आयोगाचा निकाल चुकीचा आहे. धनुष्यबाण चिन्ह हे पहिल्यापासून शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचे आहे. ते कायम ठेवायला हवे होते, असे मत रवींद्र पवार यांनी व्यक्त केले. तसेच आपल्या घरावर बाहेरच्या व्यक्तीने दावा ठोकला, तरी तो त्याचा होईल का, असा प्रश्न उपस्थित केला. बाळासाहेब ठाकरे वडिलांप्रमाणे होते. भरपूर काही त्यांनी दिले होते. पण ते यांना ओळखता आलेले नाही.

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय : निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अगदी चुकीचा आहे. ज्या ताटात आपण खातो, त्या ताटात असे करायला नको होते. तुम्ही राजकारण करा हरकत नाही. पटत नाही बाजूला व्हा, मराठी धर्माप्रमाणे वागायला हवे, असे मत एका व्यक्ती नागरिकांनी व्यक्त केले. शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसापासून ज्या काही गोष्टी घडल्या त्या काही योग्य वाटत नाही. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय योग्य आहे, अशी मतमतांतरे व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Kartik Aryan News: कार्तिक आर्यनने चुकीच्या बाजूला कार पार्क केल्याबद्दल मुंबई वाहतूक पोलिसांनी केला दंड

प्रतिक्रिया देताना सामान्य नागरिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.