ETV Bharat / state

'तेव्हा तुम्हाला त्यांचे थोबाड फोडावे वाटले नाही का?', बोरीवलीच्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा महापौरांना प्रतिप्रश्न - बोरीवलीच्या महिला अत्याचार घटना

शिवसेनेच्या या आरोपावर चित्रा वाघ यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या नेत्यांची प्रकरणे उकरून काढत 'महापौरांनी त्यावेळी का थोबाड फोडले नाही', असा प्रश्न विचारला आहे.

Chitra Wagh reply to kishori pednekar
Chitra Wagh reply to kishori pednekar
author img

By

Published : Sep 24, 2021, 7:01 AM IST

मुंबई - भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही थेट संबंधिताचा थोबाड फोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी 'भाजपा नेत्या चित्रा वाघ त्यावेळी कुठे गायब झाल्या होत्या' असा सवालही महापौरांना विचारला. दरम्यान, शिवसेनेच्या या आरोपावर चित्रा वाघ यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या नेत्यांची प्रकरणे उकरून काढत 'महापौरांनी त्यावेळी का थोबाड फोडले नाही', असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे महिला अत्याचाराच्या प्रकरणावरुन भाजप-शिवसेनेत चांगलेच जुंपणार आहे.

'आपल्या पक्षातील लोकांकडे दुर्लेक्ष का?'

बोरीवली येथे १५ ऑगस्ट २०२० रोजी विनयभंगाची घटना घडली होती. भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात हा प्रकार घडला होता. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणावरुन काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या सर्व प्रकारावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केले. विनोद घोसाळकर यांनी महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याच्या घटनेचा संदर्भ देत, 'तेव्हा तुम्हाला त्यांचे थोबाड फोडावे वाटले नाही का? तुमच्याच पक्षाच्या माजी महापौरांनी भर रस्त्यात एका महिलेचा हात पिरगळला होता, तेव्हा तुम्हाला त्याचे थोबाड फोडावे वाटले नाही का?' असा सवाल चित्रा वाघ महापौरांना विचारला आहे. दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे थोबाड फोडण्याची भाषा करताना आपल्या पक्षातील अशा लोकांकडे कानाडोळा करणे तुम्हाला शोभत नाही, असेही वाघ यांनी महापौरांना सुनावले.

हेही वाचा- कोरोना झाल्यानंतर आत्महत्या करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजारांची मदत - केंद्र सरकार

काय आहे प्रकरण -

मुंबईच्या बोरीवलीत भाजपा पदाधिकाऱ्यांने त्यांच्याच पक्षातील महिला नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेला बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पक्षात पद देतो, असे सांगून स्थानिक भाजपा पदाधिकारी प्रतीक साळवी याने एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा केला. याप्रकरणी महिलेल्या तक्रारीवरून बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, महिलेने याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली होती. मात्र, याची दखल न घेतल्याने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

'मुख्यमंत्र्यांकडून मीठ चोळायचे काम' -

आता या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याची कसून चौकशी करावी. या प्रकरणाशी संबंधित काही लोकांचे व्हिडिओ आमच्याकडे आले आहेत, ते आम्ही पोलिसांना देणार आहोत. ज्या भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात ही घटना घडली, त्या नगरसेविकेने पोलिसांना यासंदर्भात माहिती देणारे पत्र दिले आहे. तसेच पीडित महिला ही नगरसेविकाला या गुन्ह्यात खोटे अडकवण्याची धमकी देत असल्याचेही वाघ यांनी म्हटले. पीडिता धमकी देत असली, तरी आम्ही तिच्या बाजूने आहोत, पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करावी गुन्हेगाराला त्याच्या चुकीचे शासन त्याला मिळालेच पाहिजे. आम्ही पीडितेच्या बाजूने असल्याचे वाघ म्हणाल्या. दरम्यान, डोंबिवलीतही 14 वर्षीय मुलीवर 30 जणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री पीडित महिलांच्या जखमांवर मीठ चोळायचे काम करत असल्याचे वाघ यांनी सांगितले.

सुमोटोची मागणी -

संजय राठोड, निलेश लंके, राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांच्या विरोधात अनेक महिलांनी तक्रारी केल्या आहेत. सुमोटोने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाघ यांनी केली. तर भाजपा कार्यकर्ता असल्याने गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी लक्ष घातले. इतर घटनांसाठी पुढाकार का घेतला नाही, असा सवालही वाघ यांनी उपस्थित केला. राज्यात शिवशाहीचे सरकार असताना महिलांवरील अत्याचार, विनयभंगाचे प्रकार वाढले आहे. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच पुण्यात भाजपाचा कार्यकर्ता प्रशांत गायकवाड याच्या विरोधात फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी निपक्ष चौकशी कारवाई करावी, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली.

हेही वाचा - डोंबिवलीच्या घटनेच्या तपासात सरकारने विशेष प्रयत्न करावे - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.