मुंबई Chitra Wagh on Uddhav Thackeray : भाजपा व उद्धव ठाकरे यांच्यातील कटुता दिवसेंदिवस वाढतच आहे. G20 परिषदेच्या आयोजनावरुन उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यावरुन भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय. उद्धव ठाकरे हे विदूषक असून त्यांना विदूषकाचा पोषाख भेट देणार असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलंय. (Chitra Wagh on Uddhav Thackeray)
बाळासाहेब ठाकरे यांचही स्वप्न : मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चित्रा वाघ म्हणाला की, G20 चा यशस्वी कार्यक्रम दिल्लीत पार पडलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमात जग एकत्र आले. परंतु, या कार्यक्रमाने इंडीया आघाडीच्या काही लोकांच्या पोटात दुखत असून यात पहिला नंबर उद्धव ठाकरेंचा आहे. उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून आमचे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खालच्या स्तरावर टिका केली जातेय. राम मंदिराचं स्वप्न हे प्रत्येक हिंदूंचं होतं, महत्त्वाचं म्हणजे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंही ते स्वप्न होतं. हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून, यावर राम मंदिराचं उद्घाटन झालं तर गोध्रा सारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी टिका उद्धव ठाकरे यांनी केलीय. यावरुन दुसऱ्याला कमी लेखन्याच्या भूमिकेत उद्धव ठाकरे यांचा नाकर्तेपणा दिसून येतो, अशी टीका चित्रा वाघ यांनी केलीय.
सर्कसमधील विदूषक हा लोकांचं निव्वळ मनोरंजन करण्याचं काम करतो. परंतु, उद्धव ठाकरे यांना तेही जमत नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन विदूषक असून यातील पहिला विदूषक हा खासदार संजय राऊत, दुसरा विदूषक आमदार भास्कर जाधव तर तिसरे विदूषक हे स्वतः उद्धव ठाकरे आहेत. हे तिन्ही विदूषक रोज महाराष्ट्राला हसवण्याचं काम करतात. यामुळे उद्धव ठाकरेंना विदूषकाचा पोषाख भेट म्हणून पाठविणार आहोत-भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ
महाराष्ट्राला हसवण्याचे काम : उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला नसता, तर आज G20 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उद्धव ठाकरेंना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षबरोबर बसता आले असते. G20 परिषदेत जगभरातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलाय. परंतु, उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचे घर मोडलंय. यातच ते शिरजोरी करत देवेंद्र फडवणीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत. आतापर्यंतही टीका नेते सहन करत आलोय. पण यापुढे कार्यकर्ते सहन करणार नाहीत, असा धमकी वजा इशाराही चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.
हेही वाचा :