ETV Bharat / state

Liver Transplant : बालदिनाच्या निमित्ताने यकृत प्रत्यारोपण, बालकांचा डॉक्टरांसोबत रॅम्प वॉक

बालदिनाचे ( Children Day ) औचित्य साधत परेलच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ( Global Hospital ) बालरुग्णांकरिता विशेष कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. यकृत प्रत्यारोपण ( Liver Transplant on occasion of Children Day ) केलेल्या सुमारे 100 मुलांपैकी सुमारे 50 मुले हा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Children Day
Children Day
author img

By

Published : Nov 12, 2022, 4:35 PM IST

मुंबई - जेव्हा घरातील लहान मुल आजाराने त्रस्त असतात, तेव्हा मुलांबरोबरच पालक आणि कुटुंबीयांनाही तितक्याच वेदनादायक क्षणांचा सामना करावा लागतो. परंतु लहान मुलांना योग्य आणि वेळीच उपचार मिळाल्यास ते आजारातून लवकरे बरे होऊ शकतात. बालदिनाचे ( Children Day ) औचित्य साधत परेलच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ( Global Hospital ) बालरुग्णांकरिता विशेष कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते.

बालकांचा डॉक्टरांसोबत रॅम्प वॉक

बालकांनी लुटला आनंद - यकृत प्रत्यारोपण ( Liver Transplant on occasion of Children Day ) केलेल्या सुमारे 100 मुलांपैकी सुमारे 50 मुले हा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पपेट शो, गेम्स, टॅटू मेकींग, फेस पेंटिंग, मॅजिक शो आणि मुलांकरिता मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालरुग्णांनी रिंग गेम्स, टॉस युअर विन आणि इतर मजेदार खेळांचा आनंद लुटला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पालकही तो आनंद झाला.

यकृत प्रत्यारोपण - या उपक्रमात सहभागी होत यकृत प्रत्यारोपण सर्जन, बालरोग हिपॅटोलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट परिचारिका यांचा समावेश असलेल्या क्लिनिकल टीमने देखील बालदिनाचा आनंद लूटत बालरुग्णांसोबत वेळ घालवला. या कार्यक्रमाचा सर्वात रोमांचक आणि मुख्य आकर्षण म्हणजे एक रॅम्प वॉक जिथे प्रत्येक बालरुग्णांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांसोबत रॅम्प वॉक केला. रॅम्प वॉकनंतर मुलांचा सुपरहिरो म्हणून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या अवयवदानामुळे या मुलांना नवीन आयुष्य प्राप्त झाल्याचे अधोरेखित केले गेले. ग्लोबल हॉस्पिटल्सचे सीईओ डॉ. विवेक तलौलीकर यांनी सांगितले की लहान मुल हे प्रत्येकाला प्रिय असते. ते त्यांच्या निरागसतेमुळे प्रत्येकाची मनं जिंकतात आणि हेच आमच्यासाठी खूप मौल्यवान असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.