ETV Bharat / state

नाल्यामध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू, मुंबईतील घाटकोपरची घटना - mumbai nala incident

घाटकोपर पूर्व येथे पंत नगर पोलीस ठाणे आहे. त्यासमोर सावित्रीबाई फुले नगर आहे. या ठिकाणी राहणारा हुसेन हमीद शेख आपल्या भावासोबत खेळत असताना वसाहतीच्या बाजूच्या नाल्यात दुपारी पडला.

child death
नाल्यामध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू
author img

By

Published : Jun 13, 2020, 9:03 AM IST

मुंबई - घाटकोपर पूर्व येथील सावित्रीबाई फुले नगर येथे गुरुवारी दुपारी पाच वर्षांचा हमीद शेख नाल्यात पडला होता. शुक्रवारी शोधकार्यादरम्यान हमीद मृतावस्थेत आढळून आला. अग्निशमन दलाकडून गुरुवारी युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू होते. मात्र, संध्याकाळपर्यंत त्याचा शोध लागला नाही. अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली होती. शुक्रवारी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. यावेळी हमीद स्थानिकांच्या हाती लागला. स्थानिकांनी राजावाडी रुग्णालयात नेला असता, त्यास मृत घोषित करण्यात आले.

child death
चिमुकल्याला शोधण्यासाठी प्रयत्न
घाटकोपर पूर्व येथे पंत नगर पोलीस ठाणे आहे. त्यासमोर सावित्रीबाई फुले नगर आहे. या ठिकाणी राहणारा हुसेन हमीद शेख आपल्या भावासोबत खेळत असताना वसाहतीच्या बाजूच्या नाल्यात गुरुवारी दुपारी पडला. त्याला बुडताना पाहून त्याची आई रेश्मा अब्दुल हमीद शेख हिने नाल्यात उडी मारली व त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ती बुडायला लागली. मुलाचे काका करीम अब्दुल रहीम शेख यांनी नाल्यात उडी मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. रेश्मा शेख यांना वाचविण्यात यश आले. मात्र हमीद सापडला नाही. स्थानिक नगरसेविका राखी जाधव, पोलीस आणि पालिका अधिकारी या घटनेवर लक्ष ठेवून होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.