ETV Bharat / state

लॉकडाऊन ४.०ची तयारी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली महत्त्वाची बैठक - पंतप्रधान नरेंद्र मोदी

या बैठकीत झोननुसार कुठल्या गोष्टी सुरू करता येतील? यावर चर्चा झाली. अर्थव्यवस्थेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीच्या अहवालावर मंथनही झाले.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : May 14, 2020, 4:16 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मेनंतर लॉकडाऊनचे 4 संकेत दिले असताना, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. लॉकडाऊन आणि अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर कसा आणता येईल? याबाबतची चर्चा या बैठकीत झाली. या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांसह मुख्य सचिव अजोय मेहता आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह उपस्थित होते.

मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत ही बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत झोननुसार कुठल्या गोष्टी सुरू करता येतील? यावर चर्चा झाली. अर्थव्यवस्थेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीच्या अहवालावर मंथनही झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याबाबतचे नियम 18 मेपूर्वी जाहीर करू, असं त्यांनी सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवरही महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

देशातील तिसऱ्या लॉकडाऊनची मुदत 17 मे रोजी संपणार आहे. मात्र, त्यापुढील म्हणजे चौथ्या लॉकडाऊनची रणनीती कशी असेल? कुठे शिथिलता द्यायची? उद्योगधंदे कसे सुरू करायचे? कुठे सुरू करायचे? अशी सर्वव्यापी चर्चा या बैठकीत झाली. कोरोनाशी लढा देत असताना टप्प्याटप्प्याने नियोजनबद्ध अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहेत. 5 टक्के मनुष्यबळात प्रशासन सुरू असताना बँकिंग आणि इतर वित्तीय सेवा तसेच सर्व कोरोना सुरक्षिततेचे नियम पाळून टप्प्या-टप्प्याने उर्वरित सेवाही सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अतिवृष्टी तसेच राज्यातील खरिपाच्या संदर्भातही बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.