ETV Bharat / state

'कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील खटले मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक' - Chief Minister uddhav thackeray

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील खटले मागे घेण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यासोबतच, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल असूनही कारवाई  झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

cong
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड
author img

By

Published : Dec 11, 2019, 7:25 PM IST

Updated : Dec 11, 2019, 8:06 PM IST

मुंबई - गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते सर्व खटले मागे घेण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे. आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेतली, त्याप्रसंगी ते माध्यमांसोबत बोलत होते.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड

हेही वाचा - भिमा-कोरेगावसह मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा निदर्शने

तसेच, कोरेगाव भीमा प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल असूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंजाब बँकेच्या खातेदारांना दिलासा देण्यासाठी केंद्राने त्यांचे पैसे द्यावेत; अथवा ही बँक इतर बँकेत विलीन करावी आणि यातून मार्ग काढावा, अशी मागणी केल्याचेही गायकवाड यांनी सांगितले आहे.

Intro:भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील खटले मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक - एकनाथ गायकवाड
mh-mum-01-bhimakoregav-eknathgaikwad-byte-7201153
यासाठीचा बाईट ३ जी लाईव्ह वरून पाठवले आहे
मुंबई, ता. ११ :
मागील वर्षी भीमा कोरेगाव येथे झालेल्या १ जानेवारीच्या घटनेनंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी ज्या भीमसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, ते सर्व खटले मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला आश्वासन दिले असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी आज मंत्रालयात दिली.
मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांची आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात भेट घेतली त्यानंतर गायकवाड यांनी माध्यमांशी माहिती देताना भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ दरम्यान, जी घटना झाली त्यानंतर तीन दिवस राज्यात उद्रेक झाला. त्या दरम्यान राज्यभरात ज्या भीम सैनिकांवर खटले दाखल झाले तर खटले मागे, घेण्याची आम्ही मागणी केली त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली होती, त्यात त्यांनी हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले. तसेच भीमा कोरेगाव प्रकरणासाठी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होत नाही, त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली, त्यावरही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले असल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली.
यासोबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंजाब बँकेच्या खातेदारांना दिलासा देण्यासाठी केंद्राने त्यांचे पैसे द्यावेत अथवा ही बँक इतर बँकेत विलीन करावी आणि यातून मार्ग काढावा अशी मागणी केली असल्याची माहितीही दिली.
Body:भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील खटले मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक - एकनाथ गायकवाड
Conclusion:
Last Updated : Dec 11, 2019, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.