मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीमधील कोस्टल रोडची व अंधेरीतील मिलन सबवेची पाहणी केली. याप्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, काल (शनिवारी एका तासामध्ये ७० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. तरी पाणी भरले नसल्याने सबवे सुरू होता. याचे कारण मिलन सब वेमध्ये बसविण्यात आलेली सिस्टम आहे. मी स्वतः आज ही सिस्टम कशा पद्धतीने काम करते, हे पाहण्यासाठी आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मिलन सब वेमध्ये पाणी भरल्यानंतर ताबडतोब पंपिंगद्वारे ते पाणी नाल्यामध्ये सोडले जाते. तिथून ते पाणी टाकीत सोडले जाते. त्याचबरोबर येथे फ्लड गेट सुद्धा बसवण्यात आले आहेत. जेव्हा भरतीचे पाणी पुन्हा बाहेर फेकले जाते, तेथे पाणी येऊ नये याकरता हे फ्लॅट गेट आहेत. एकंदरीत मिलन सब वेचा हा उपक्रम यशस्वी झाला आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी अशाच पद्धतीची यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
-
#WATCH | Today I am here at Milan Subway and yesterday it rained about 70 mm within 1 hour here but traffic movement has not stopped as a water storage tank has been built here. Floodgate has also been installed here. I have directed the department to ensure that people do not… pic.twitter.com/rSPpSrRB5b
— ANI (@ANI) June 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Today I am here at Milan Subway and yesterday it rained about 70 mm within 1 hour here but traffic movement has not stopped as a water storage tank has been built here. Floodgate has also been installed here. I have directed the department to ensure that people do not… pic.twitter.com/rSPpSrRB5b
— ANI (@ANI) June 25, 2023#WATCH | Today I am here at Milan Subway and yesterday it rained about 70 mm within 1 hour here but traffic movement has not stopped as a water storage tank has been built here. Floodgate has also been installed here. I have directed the department to ensure that people do not… pic.twitter.com/rSPpSrRB5b
— ANI (@ANI) June 25, 2023
चांगल्या कामाचा सत्कार : मुख्यमंत्री पुढे म्हणाले आहेत की, आम्ही पावसाचे स्वागत करतो. परंतु पावसामुळे लोकांचे हाल होणार नाहीत, याकडे आम्ही जातीने लक्ष देऊन आहोत. मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी हे ऑन फिल्ड असून त्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. आयुक्तांनाही सांगण्यात आलेले आहे.
ही माझी सरप्राईज व्हिजिट होती. परंतु याचा अर्थ कुणावर अविश्वास दाखवणे असे नाही. जिथे जिथे चांगले काम होईल त्यांचा सत्कार नक्कीच केला जाईल. पण जिथे हलगर्जीपणा केला जाईल त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालकमंत्र्यांनी घेतला वॉर रूमचा आढावा: एकीकडे मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरून मुंबईतील विविध ठिकाणी पाहणी करत असताना दुसरीकडे
मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेतील वॉर रूमला भेट देऊन मुंबईतील सर्व ठिकाणची मॉनिटरिंग केली. उशिराने मुंबईत दाखल झालेल्या पावसाने शनिवारपासून जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील ४८ तासांत मोसमी वारे मुंबईत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शनिवारपासून पडलेल्या २४ तासांत मुंबईत १७६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सर्वात जास्त पाऊस ५.३० ते ७.३० या वेळेत पडला आहे. या दरम्यान ८८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
हेही वाचा-