ETV Bharat / state

Aaditya Thackeray Criticizes Eknath Shinde : स्वार्थासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Aditya Thackeray targeted the Chief Minister

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath ) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकावर टीका ( Aaditya Thackeray criticizes Eknath Shinde) केली आहे. परराज्यातील मुख्यमंत्री गुंतवणुकीसाठी आपल्या राज्यात येतात आणि आमचे मुख्यमंत्री स्वतःसाठी दिल्लीत जातात. हे महाराष्ट्राचे दुदैव आहे अशी टीका आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी मुख्यमंत्र्यावर केली.

Aaditya Thackeray Criticizes Eknath Shinde
स्वार्थासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
author img

By

Published : Jan 5, 2023, 5:27 PM IST

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath ) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांनी यावरून मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा ( Aditya Thackeray criticizes Eknath Shinde ) साधला. परराज्यातील मुख्यमंत्री गुंतवणुकीसाठी आपल्या राज्यात येतात आणि आमचे मुख्यमंत्री स्वतःसाठी दिल्लीत जातात. हे महाराष्ट्राचे दुदैव आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत ( Yogi Adityanath on Maharashtra Visit ) होते.

राजकारण तापण्यास सुरुवात - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनेचे इतर राज्यातील नेत्यांचे देखील महाराष्ट्रातील दौरे वाढले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याबाबत विचारले असता आदित्य म्हणाले की, उत्तर प्रदेशात उद्योग यावेत यासाठी ते मुंबईत येऊन उद्योजकांना आणि विविध क्षेत्रातील लोकांना गळ घालत आहेत. पूर्वी शिवराजसिंह चौहान येऊन गेले, आता योगी आदित्यनाथ आले आहे. मधल्या काळात अशोक गेहलोत येऊन गेले. हे मुख्यमंत्री आपापल्या राज्यासाठी इतर राज्यांत जातात, उद्योग क्षेत्रातील लोकांना भेटून आपले राज्य पुढे कसे जाईल यावर विचार करत असतात. मात्र आताचे जे मुख्यमंत्री आहेत ( Aditya Thackeray targeted the Chief Minister ) ते स्वतःसाठी दिल्लीत जातात, गुवाहाटीला जातात पण महाराष्ट्रासाठी ते कधीच जात नाहीत, असा टोला लगावला.

निवडणुका लावायची हिंमत दाखवा - मुंबईतील सिनेटच्या निवडणुकीबाबत आदित्य ठाकरे यांना छेडले असता, ते म्हणाले की निवडणुकीच्या आखाड्यात उतरून एकप्रकारे दंडच थोपटले. आम्ही तर निवडणुकीची वाटच पाहत आहोत. पहिल्यापासून आम्ही हेच म्हणत आहे की चाळीस आमदार आणि 13 खासदार यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे. सिनेट ठीक आहे पण त्यांनी महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात पण त्यांच्यात हिंमत नाही म्हणून हे चालू आहे. नवीन वर्षात तरी या सरकारने हिंमत दाखवावी. चाळीस गद्दारांच्या, 13 गद्दार खासदारांच्या जागी आणि महापालिकेच्या ठिकाणी निवडणूक घेण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी केले आहे. राज्यात दोन सीएम आहेत. एक सीएम, दुसरे सुपर सीएम ते राज्यासाठी कधीच जात नाही ते स्वतःसाठी जातात असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. कामे धडाक्याने होत असतील तर मग ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात चांगले रस्ते का नाही झाले, नागपुरात चांगले रस्ते का झाले नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे. मुंबईकरांचा पैसा लुटायचा हा जो प्रयत्न सुरू आहे, आम्ही तो रोखणार असून यावर खोलात अभ्यास करून कायदेशीर रोखण्याचा प्रयत्न करू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.