मुंबई Chhota Shakeel : मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा साथीदार रियाज भाटी विरुद्ध जीवे मारण्याच्या धमकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. रियाजनं साक्षीदाराला धमकी दिलीय. साक्षीदाराच्या तक्रारीनुसार, 2021 मध्ये मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात रियाज विरुद्ध एक एफआयआर दाखल झाला होता. या प्रकरणात साक्षीदार असणार्याला रियाज भाटी आणि त्याच्या निकटवर्तीयांनी जून 2022 ते 4 नोव्हेंबर 2023 दरम्यान धमक्या दिल्या आहे. तक्रारदारानं साक्ष देण्यासाठी कोर्टात जाऊ नये. गेल्यास रियाजच्या बाजूनं बोलावं. असं केलं नाही तर त्याला जीवे मारलं जाईल, अशी धमकी दिली होती.
तक्रारदाराचं म्हणणं काय : तक्रारदारानं तक्रारीत दिलेल्या माहितीप्रमाणे, तो ज्या प्रकरणामध्ये साक्षीदार आहे त्यात रियाज भाटी हनी ट्रॅप लावून पैसा उकळत होता. अशाच एका वसुलीच्या प्रयत्नामध्ये त्याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 384 आणि पिटा अॅक्टच्या कलम 5 आणि 9 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आलीय. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, रियाज भाटी हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा साथीदार असून सोबतच छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुटचा देखील अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. पोलिसांनी तक्रारदाराच्या तक्रारीनंतर रियाझ भाटी आणि त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांविरुद्ध आयपीसीच्या कलम 195(A), 506(2) आणि 34 अंतर्गत खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू झालाय.
याचा तपास क्राईम ब्रांचकडे : एका अधिकार्यानं दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अंडरवर्ल्डशी निगडीत आहे. त्यामुळं याचा तपास क्राईम ब्रांचकडं दिला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, रियाज भाटी सध्या जेलमध्ये असून त्यानं जेल मधून साक्षीदाराला धमकवण्यासाठी सूत्रं हलवली. रियाज भाटीचं नाव अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम सोबत जोडण्याची चर्चा यापूर्वी देखील झाली होती. मात्र नंतर त्यानं छोटा शकील सोबत काम सुरू केलं. भाटीनं मात्र दाऊदचा साथीदार असल्याचा दावा फेटाळला होता.
हेही वाचा :
- Chhota Rajan : दुहेरी हत्याकांडातील अंडरवर्ल्ड डॉन छोटा रनसह चार आरोपींची निर्दोष मुक्तता
- Shooter Arrested : गँगस्टर छोटा शकीलच्या शूटरला २५ वर्षांनंतर अटक; मुंबई पोलिसांची कारवाई
- Salim Fruit withdraws Bail Application अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम फ्रुटने डिफॉल्ट जामीनाचा अर्ज घेतला मागे