ETV Bharat / state

Prasad Lad : छत्रपती शिवरांयांचा जन्म कोकणात झाला, रायगडावर त्यांचे बालपण - प्रसाद लाड

author img

By

Published : Dec 4, 2022, 3:36 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले, असे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले ( Prasad Lad insulted statement Shivaji Maharaj  ) होते. लाड यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

PRASAD LAD
प्रसाद लाड

मुंबई : 'स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, तर हिंदवी स्वराज्याची स्थापन छत्रपती शिवाजी महाराज यांनी ( Prasad Lad insulted statement Shivaji Maharaj ) केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले, त्यांची सुरूवात कोकणात झाली, असे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले होते. लाड यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

दिलगिरी व्यक्त : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच, आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही कोकण महोत्सवामध्ये ( Konkan Festival ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात काल अजब वक्तव्य केले. यावरुन राष्ट्रवादीकडून टीका करण्यात आली. मात्र त्यानंतर प्रसाद लाड यांनी या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले प्रसाद लाड? : यावर बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो. त्या कार्यक्रमांमध्ये बोलताना माझ्याकडून जी चूक झाली होती, ती मी सुधारली सुद्धा होती. हिंदवी स्वराज्याची स्थापना कोकणात झाली ( Hindavi Swarajya Established in Konkan) व जन्म शिवनेरीला ( Shivaji Maharaj born in Konkan ) झाला. हे माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादव यांनी सुद्धा तेव्हा लक्षात आणून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करत आहे. त्याचा मी निषेध करतो. माझ्या शब्दाने जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रसाद लाड यांनी या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली असली तरी सुद्धा, याप्रकरणी त्यांनी माफी मागायला हवी अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.