ETV Bharat / state

'निर्भयाला न्याय मिळाला आता कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळावा' - निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना आज (शुक्रवारी) पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात आली. ही घटना देशातील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारी असल्याचे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

chhatrapati sambhaji raje comment on nirbhaya case
खासदार छत्रपती संभाजीराजे
author img

By

Published : Mar 20, 2020, 1:18 PM IST

मुंबई - निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना आज (शुक्रवारी) पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात आली. अखेर ७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर निर्भयाच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. ही घटना देशातील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारी असल्याचे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. निर्भयला न्याय मिळाला आहे, आता कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळण्याची प्रतिक्षा असल्याचेही संभाजीराजे म्हणाले.

निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी दिल्यानंतर संभाजीराजेंनी ट्वीट करत राष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालय यासह सर्व देशवासियांचे आभार मानले. तसेच कोपर्डीचे बलात्कारी नराधम सुद्धा लवकरात लवकर फासावर लटकले पाहिजेत. त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहेत. यापुढे गुन्हेगारांना आमच्या माता भगिनीवर वाईट नजरेने बघण्याचे धाडस सुध्दा झाले नाही पाहिजे, असेही संभाजीराजे म्हणाले.

  • देशातील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारी हि घटना आहे. निर्भयला न्याय मिळाला, आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळण्याची. कोपर्डी चे बलात्कारी नराधम सुद्धा लवकरात लवकर फासावर लटकले पाहिजेत. त्यासाठी राज्यसरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहेत.

    — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्लीच्या तिहार जेलमध्ये चारही आरोपींना फाशी देण्यात आली. दिल्लीमध्ये 16 डिसेंबर 2012 ला घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता. तेव्हापासून दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी निर्भयाचे कुटुंबीय आणि संपुर्ण देश वाट पाहत होता. आज अखेर तो दिवस उजाडला. दोषींची फाशी टळावी यासाठी रात्री उशीरापर्यंत प्रयत्न झाले. मात्र, सुप्रीम कोर्टाने सगळ्या याचिका फेटाळून लावत फाशीचा निर्णय कायम ठेवला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.