ETV Bharat / state

Chhatrapati Sambhaji Raje : छत्रपती संभाजी राजे राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यावर आक्रमक ; कोश्यारींना हटविण्याकरिता आक्रमक असल्याचे संकेत

author img

By

Published : Nov 27, 2022, 12:00 PM IST

संभाजीनगर येथे झालेल्या विद्यापीठाच्या दीक्षांत कार्यक्रमादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या विवादित वक्तव्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली (Koshyari contraversial statment) आहे. अनेक शहरातून राज्यपालांवर टीका केली जात आहे. आता छत्रपती संभाजी राजे यांनीही राज्यपालांवर अद्याप राज्य सरकार ने कोणतीही कारवाई केली नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली (Sambhaji Raje Aggressive on Governor Bhagat Singh) आहे.

Chhatrapati Sambhaji Raje
छत्रपती संभाजी राजे

मुंबई : संभाजीनगर येथे झालेल्या विद्यापीठाच्या दीक्षांत कार्यक्रमादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या विवादित वक्तव्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली (Koshyari contraversial statment)आहे. अनेक शहरातून राज्यपालांवर टीका केली जात आहे. आता छत्रपती संभाजी राजे यांनीही राज्यपालांवर अद्याप राज्य सरकार ने कोणतीही कारवाई केली नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बीडच्या माध्यमातून संभाजी राजे यांनी राज्यपालांबाबत नाराजी व्यक्त करत सरकारलाही अद्याप कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित केला आहे. यासोबतच राज्यपाल हटावचा नारा संभाजीराजांनी आपल्या ट्विटमधून (Sambhaji Raje Aggressive on Governor Bhagat Singh) दिला.

राज्यपालांना हटवले नाही तर उठाव होईल : भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत राज्य व केंद्र सरकारला जाब विचारला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे, अशी मागणी केली होती. तसे अधिकृत पत्रही त्यांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांना पाठविले होते. मात्र अद्याप कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. याचा अर्थ राज्यकर्ते त्यांच्या विधानाशी सहमत आहेत का ? असा खडा सवाल विचारत संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरू नये, शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील, तर उठाव होणारच, असा इशारा दिला (Chhatrapati Sambhaji Raje) आहे.

Chhatrapati Sambhaji Raje
छत्रपती संभाजी राजे

काय म्हणाले होते राज्यपाल? : काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. 'शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले होते. यानंतर राज्यभर ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. तसेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी राज्यपालांचा विरोध केला. उदयनराजेंनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्रही लिहिले असून राज्यपालांना पदावरून दूर हटवले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यपालांवर कारवाईसाठी उच्च न्यायालयात याचिका? : राज्यपाल कोश्यारी यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. दीपक जगदेव यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या घटनापिठाची स्थापना करावी आणि अनुच्छेद ६१ आणि १५६ अन्वये राज्यपालांना हटवण्याचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्य विधानमंडळाच्या अध्यक्षांनी घ्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा अवमान करून महाराष्ट्रात दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी चिथावणी देणाऱ्या राज्यपालावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ही या याचिकेत करण्यात आली आहे.

राज्यपालांना पदावरून दूर करा? : राज्यपालांकडून सातत्याने महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांनी यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता असा आरोप करत महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या राज्यपालांना पदावरुन मुक्त करा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यात आता राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर गेल्याने त्यांना पदमुक्त करण्याबाबत काही निर्णय होणार का याबाबतही चर्चा रंगली आहे. परंतु राज्यपालांच्या नवी दिल्ली दौऱ्याबाबत राजभवन कडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नसून अद्याप कार्यक्रम व भेटीगाठीचां तपशील ठरला नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.