ETV Bharat / state

Chhagan Bhujbal : 'जरांगे पाटील खूप काही बोलतात, त्यावर बोलायला मी...' - कुणबी प्रमाणपत्र

Chhagan Bhujbal On Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर राज्यामध्ये वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसापासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. जरांगे खूप काही बोलतात त्यावर बोलायला मी मोकळा नसल्याचं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावलाय.

Bhujbal On Jarange Patil
छगन भुजबळ आणि जरांगे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 8:42 PM IST

Updated : Nov 9, 2023, 10:04 PM IST

मुंबई Chhagan Bhujbal On Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशा प्रकारची भूमिका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतल्यानं मराठा समाजामध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये नाराजी आहे. त्याच अनुषंगानं सध्या मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय.

मंत्र्यांनी संयमानं बोलावं : कोणत्याही प्रकारचा या दोन्ही समाजात वाद निर्माण होऊ नये, तसेच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी वाद निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करू नये, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांना संयमानं बोलावं अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा हे आधीपासून कुणबी होते अशा प्रकारचे वक्तव्य केलं होतं. या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, ते खूप काही बोलतात. सगळ्यांवर बोलायला मी काही मोकळा नाही.

भुजबळांनी एकनाथ खडसेंची घेतली भेट : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी एकनाथ खडसे यांची बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली.

विजय वडेट्टीवार यांचं समर्थन : मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवलाय. मराठा समाजामध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात तीव्र भावना आहेत. भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन करण्यासाठी सर्वच ओबीसी नेते त्यांच्या मागे उभे राहिले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भुजबळ यांना समर्थनं दिलं आहे.

खडसे यांच्या तब्येतीची केली विचारपूस : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ एकाकी पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. मंत्रिमंडळातील सहकारी देखील मराठा आरक्षणाच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. एकाकी पडलेले छगन भुजबळ यांनी गुरुवारी ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांनी खडसे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासोबतच ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे. ज्याप्रकारे बिहार राज्यात आरक्षण मर्यादा वाढवली गेली, त्याप्रमाणे महाराष्ट्रात आरक्षण मर्यादा वाढून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशा प्रकारची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यासोबत जातीनिहाय जनगणना राज्यात करण्यात यावी, ही देखील मागणी आपली कायम असल्याचं यावेळी ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. Chhagan Bhujbal On Manoj Jarange : समाजासाठी जीव जाणार असेल तर... ; मनोज जरांगे पाटलांच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर
  2. Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर
  3. Tanaji Sawant On Maratha Reservation : दोन वर्षात कोणीच आंदोलन केलं नाही, आताच आंदोलन का - आरोग्य मंत्री तानाजी सावंत

Last Updated : Nov 9, 2023, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.