ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खैरे - सत्तार वादावर पडदा, शिवसेना मजबूत करण्यावर देणार भर - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खैरे - सत्तार वादावर पडदा

औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता. त्यांनतर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचे वृत्त देखील समोर आले होते. त्यामुळे खैरे आणि सत्तार यांच्यातील वाद समोर आला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीनंतर हा वाद संपुष्ठात आला आहे.

chandrkant khaire and abdul sattar
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खैरे - सत्तार वादावर पडदा
author img

By

Published : Jan 6, 2020, 9:43 PM IST

मुंबई - औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता. त्यांनतर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचे वृत्त देखील समोर आले होते. त्यामुळे खैरे आणि सत्तार यांच्यातील वाद पुन्हा समोर आला होता. मात्र, आज मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर खैरे-सत्तार यांच्या वादावर पडदा पडल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दोघांनीही पक्षशिस्त पाळून काम करण्याचे ठरवले आहे. दोघेही एकमेकांसोबत काम करुन पक्ष वाढतील असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खैरे - सत्तार वादावर पडदा

आमच्यातील वाद मिटला - खैरे
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बरीच चर्चा झाली. आता आमच्यातील वाद मिटलेला आहे. उद्धव ठाकरे यांना त्रास होईल असे वागायचं नाही असं ठरल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले. दोघेही पक्षसंघटना वाढवण्यासाठी काम करू. ते माझे मंत्री आहेत, मी त्यांचा नेता आहे. रागाच्या भरात सत्तार यांच्यावर टीका केली होती, पण आता सर्व ठीक असल्याचे खैरे म्हणाले.

गैरसमज झाले होते ते आता दूर झाले - सत्तार
खैरेसाहेब हे आमचे नेते आहेत. दोघांमध्ये जे गैरसमज झाले होते ते दूर झालेत. उद्धव ठाकरे जे आदेश देतील त्याचे तंतोतंत पालन केले जाईल. तसेच शिवसेना मजबूत करण्यावर आता भर दिला जाईल असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. उद्धवजी जे आदेश देतील त्याप्रमाणे काम होईल. शिवसेनेला किंवा त्यांच्या उमेदवाराला दगाफटका होईल असे कोणतेही काम होणार नसल्याचे सत्तार म्हणाले. अल्पसंख्यांक समाज शिवसेनेशी कसा जोडेल यासाठी काम करेन. आता औरंगाबाद व संभाजीनगर एक झालेत, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

Intro:
मुंबई - औरंगाबाद मधील शिवसेनेचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर समोर आला होता. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचे वृत्त देखील समोर आले होते. अखेर आज राज्य मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मातोश्रीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या चर्चेनंतर खैरे अब्दुल सत्तार यांच्या वादावर पडदा पडल्याचे राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. Body:दाेघांनीही पक्षशिस्त पाळून काम करण्याचे ठरवले आहे. चंद्रकांत खैरे नेते तर सत्तार मंत्री आहेत. दाेघेही एकमेकांसाेबत काम करून पक्ष वाढतील असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आमच्यातील वाद मिटलेला आहे, बरीच चर्चा झालीच. उद्धव ठाकरे यांना त्रास हाेईल असं वागायचं नाही असं ठरलं, पक्षसंघटना वाढवण्यासाठी काम करू. ते माझे मंत्री आहेत, मी त्यांचा नेता आहे. रागाच्या भरात सत्तार यांच्यावर टिका केली हाेती, पण आता सर्व ठीक असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले.
खैरेसाहेब नेते आहेत, दाेघांमध्ये जे गैरसमज झाले हाेते ते दूर झालेत. उद्धव ठाकरे जे आदेश देतील त्याचे तंताेतंत पालन केले जाईल. शिवसेना मजबूत करण्यावर आता भर दिला जाईल.
जे आदेश उद्धवजी देतील त्याप्रमाणे काम हाेईल, शिवसेनेला किंवा त्यांच्या उमेदवाराला दगाफटका हाेईल असं काम हाेणार नाही.अल्पसंख्यांक समाज शिवसेनेशी कसा जाेडेल यासाठी काम करेन आणि आता आैरंगाबाद व संभाजीनगर एक झालेत अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.