ETV Bharat / state

Chandrashekhar Bawankule News: उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

Chandrashekhar Bawankule News : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र, मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत जे वक्तव्य केलंय. त्यावरून देशात एक नवीन वादाला तोंड फुटलंय. यावरून भाजपसह देशातील अनेक नेत्यांनी स्टॅलिन यांच्यावर टीका केलीय. याच अनुषंगानं इंडिया आघाडीमध्ये स्टॅलिन यांना घेतल्यामुळे उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात ते बोलत होते.

Chandrashekhar Bawankule News
चंद्रशेखर बावनकुळे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 9:44 PM IST

Updated : Sep 12, 2023, 10:22 PM IST

मुंबई Chandrashekhar Bawankule News : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र, मंत्री उदयननिधी स्टॅलिन यांनी चेन्नई येथे बोलताना सनातन धर्माची तुलना मलेरिया त्याचप्रमाणे डेंगूशी केली होती. ते म्हणाले होते की, सनातन धर्म, सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात असून काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवाव्याचं लागतात. जसे की डासांमुळे डेंगू, कोरोना आणि मलेरियासारखे आजार होतात. त्याचा आपण विरोध करू शकत नाही. त्यांचा नायनाट करावा लागतो. सनातन धर्म ही तसाच आहे, असं खळबळजनक वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

भारतीयांचा अपमान : ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेला स्पष्ट करावं की, उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन व हिंदू धर्माबाबत जे वक्तव्य करून 140 कोटी भारतीयांचा अपमान केला आहे. त्या उदयनिधी बरोबर उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीमध्ये युती केली आहे. उद्धव ठाकरे यांना उदयनिधी यांनी केलेलं हे वक्तव्य मान्य आहे का? जर त्यांना ते मान्य असेल तर त्यांनी ते सांगावं, मान्य नसेल तर त्यांनी इंडीया आघाडीमधून बाहेर पडायला पाहिजे, असा सल्लाही बावनकुळे यांनी दिलाय.

कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न : पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे सध्या नको त्या विषयावर भाष्य करत आहेत. राम मंदिर उद्घाटनाप्रसंगी तिथे गोध्रा हत्याकांड होईल. त्याचप्रमाणे दंगली होतील. हे त्यांचं वक्तव्य म्हणजे एक प्रकारे समाजात तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न आहे. अशा पद्धतीची वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून मतांचं राजकारण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. परंतु नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश अतिशय पुढे गेलाय. देशात, महाराष्ट्रात दंगली घडविण्याची कोणाच्यात हिम्मत नाहीय. उद्धव ठाकरे यांना जर का दंगली घडतील, असे वाटत असेल तर त्यांनी सरकारला त्याची माहिती द्यायला पाहिजे. राजकारणासाठी व स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी जर ते अशी बेजबाबदार विधाने करत असतील तर हे त्यांना शोभत नाही, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावलाय.

वंचित समाजाचे प्रश्न भाजपा सोडविणार : तसंच वंचित समाजाचे विकासाचे प्रश्न केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सोडवेल, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी दिली. वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. तसंच भोसले यांच्या बरोबर राज्यातील घडशी समाज तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय.

कार्यकर्त्यांचा ओढा : प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भोसले यांचे स्वागत करत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली. भोसले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अनेक वर्षे काम केलं. त्यांनी दक्षिण मध्य मुंबईमधून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली देश बनत आहे. आत्मनिर्भरतेच्या दिशेनं एक एक पाऊल आत्मविश्वासानं टाकतंय. पंतप्रधान मोदी आणि विकासाचा ध्यास असलेले राज्यातील नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षांतील कार्यकर्त्यांचा ओढा भाजपाकडे वाढलाय. महायुती सरकारच्या माध्यमातून वंचित समाजाचे प्रश्न मार्गी लावले जातील. तसंच घडशी समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी नमुद केलंय.

हेही वाचा :

  1. Lathicharge on Maratha Protester : आधी मोठे मोर्चे निघाले, पण आताच....? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
  2. Bawankule Criticize INDIA : विरोधकांची आघाडी बारुद नसलेला बॉम्ब; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
  3. NCP Maharashtra Politics : राष्ट्रवादीत खरंच बंडखोरी झाली का? शरद पवारांच्या पुतण्यावरील विधानावरून राजकीय चर्चांना उधाण

Last Updated : Sep 12, 2023, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.