मुंबई - हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी साधारण पावसाची शक्यता आहे. तर शनिवारी झालेल्या पावसामुळे मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता सुरळीत झाली आहे.
हवामान खात्याने समुद्राला येणाऱया भरती आणि ओहोटीची वेळ जाहीर केली आहे ती पुढीलप्रमाणे,
आज भरतीची वेळ - रात्री १ : 00 वा. - ३.९५ मी
ओहोटीची वेळ - दुपारी ३ : ४९ वा. - २.०९ मी
उद्या भरतीची वेळ - रात्री ११.३९ वा. - ३.५० मी
ओहोटीची वेळ - दुपारी ३ : ५३ वा. - ०.७८ मी