ETV Bharat / state

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता - मुंबई हवामान विभाग बातमी

५ ते १२ जानेवारीदरम्यान उत्तर महाराष्ट्र तसेच विविध भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

chance of rain in maharashtra in next few days said by meteorological department in mumbai
येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता
author img

By

Published : Jan 5, 2021, 6:37 PM IST

मुंबई - वातावरणातील चढ उतारामुळे सध्या मुंबईकरांना थंडीत पावसाळ्याचा अनुभव येत आहे. मुंबई शहरातील काही भागात आज ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अरबी समुद्राचा वायव्य भाग ते उत्तर पंजाब या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, तर गुजरात व राजस्थानच्या नैॠत्य भागात आणि सौराष्ट्र या भागात चक्रिवादळासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ५ ते १२ जानेवारीदरम्यान उत्तर महाराष्ट्र तसेच विविध भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान तज्ज्ञांची प्रतिक्रिया
वेस्टर्न डिस्टर्बन्स हे वैज्ञानिक कारण -

तापमानाचा पारा वाढूनही हवेत अधिक गारवा निर्माण झाला आहे. पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र तसेच विविध भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व दाट धुके पडले आहे. अनेक ठिकाणी दवबिंदू दिसून येत आहेत. यामागे अफगाणिस्तानकडून येणारे पश्चिमी वारे म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स हे वैज्ञानिक कारण आहे. ५ ते १२ जानेवारीदरम्यान पाऊस पडू शकतो, असे कुलाबा हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पुढील हवामानाचा अंदाज -

४ ते ६ जानेवारी येथे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ७ जानेवारीला कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ८ जानेवारीला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचा इशारा -

६ जानेवारी रोजी दक्षिण कोकण गोवा व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर ७ जानेवारी रोजी दक्षिण कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - राजस्थान-हिमाचलनंतर केरळमध्येही 'बर्ड-फ्लू'चा कहर; राज्य आपत्ती घोषित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.