ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेने केली पावसाळी पूर्व कामे, सुरळीत सेवा देण्याचा मानस

एप्रिल आणि मे महिन्यात लॉकडाऊनचा फायदा घेत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरी मार्गावर तसेच घाटांमध्ये मान्सून खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.

author img

By

Published : Jun 4, 2020, 6:55 PM IST

मध्य रेल्वे सफाई काम
मध्य रेल्वे सफाई काम, Central railway cleaning work, Central railway clean mumbai

मुंबई - पावसाळ्यात सुरळीत सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेने पावसाळ्याची तयारी केली आहे. गटारे नाले साफ करणे, झाडे सुशोभित करणे, दरडींचे स्कॅनिंग करणे, पाणी तुंबणाऱ्या असुरक्षित ठिकाणी उच्च व्होल्टेज पंपांची व्यवस्था, मल्टी-सेक्शन डिजिटल काउंटर इ. तरतूद करण्यात आली आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात लॉकडाऊनचा फायदा घेत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरी मार्गावर तसेच घाटांमध्ये मान्सून खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.

मध्य रेल्वेने मुसळधार पावसात पाणी तुंबणारे 17 असुरक्षित ठिकाणे शोधून काढली आहेत आणि त्या ठिकाणी 140 हून अधिक पंपांची (रेल्वे व बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे) तरतूद केली आहे. यावर्षी पूर टाळण्यासाठी पूरग्रस्त ठिकाणी जास्त संख्येने व अधिक क्षमतेचे पंप वाढविण्यात आले आहे. मुख्य मार्गावर मस्जीद, माझगाव यार्ड, भायखळा, करी रोड, शीव, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, नाणीपाडा, ठाणे, डोंबिवली व हार्बर मार्गावर शिवडी, वडाळा, चुनाभट्टी, कोपरखैरणे आणि तसेच मुख्य मार्गावरील दक्षिण-पूर्व दिशेकडील कि.मी 65 /7-8 व किमी 75/1-2 येथील भुयारी मार्ग (सबवे) अशी काही ठिकाणे चिन्हांकित करण्यात आली आहेत.

उपनगरी भागात 113 कि.मी नाल्यांची साफसफाई

मध्य रेल्वेने आपल्या उपनगरी भागात 113 कि.मी नाल्यांची साफसफाई केली आहे. तसेच उपनगरी भागातील मुख्य मार्गावरील 55 आणि हार्बर मार्गावरील 22 असे एकंदर 77 कल्वर्टसची साफसफाई केली आहे. घाटकोपर - कांजूरमार्ग, घाटकोपर - विक्रोळी दरम्यानचे नाले आणि कुर्ला टर्मिनल नाला हे अतिशय महत्वाचे नाले साफ केले आहेत.

मध्य रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागातील उदा. कसारा ते इगतपुरी दरम्यान, 18 बोगद्यांची तपासणी करण्यात आली, दरडींचे स्कॅनिंग करण्यात आले, 40 दरड शोधून कोसळविण्यात आले आहेत. शिवाय, 14 ठिकाणी 50 पाहरेकरी तैनात केले जात आहेत आणि 24×7 अशी सातत्याने देखरेख ठेवण्यासाठी आणि वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून 7 बीट्सवर 75 गस्तीदार तैनात केले जात आहेत.

दक्षिण-पूर्व विभागातील 52 बोगद्यांची तपासणी

मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागातील उदा. कर्जत ते लोणावळा दरम्यान, 52 बोगद्यांची तपासणी करण्यात आली, बोल्डर स्कॅनिंग करण्यात आले. शिवाय 74 पाहरेकरी वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. तसेच 24×7 सातत्याने पहारा ठेवण्यासाठी आणि वाहतुकीस कोणताही अडथळा येवू नये म्हणून 54 गस्तीदार (पेट्रोलमन) तैनात केले जात आहेत.

आणखी एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे दक्षिण पूर्व घाट विभागात बोगदा क्र.48 व 31 यांच्या बोगदा पोर्टल विस्ताराचे बांधकाम झाल्यामुळे रेल्वे मार्गावर दरड कोसळण्यास प्रतिबंध होईल.

लॉकडाऊनचा फायदा घेत कुर्ला ते विद्याविहार स्थानकांदरम्यान कल्वर्टसची क्षमता वाढवण्यासाठी 70 मीटर्सच्या लांबीची व 1.8 मीटर व्यासाचे 2 पाईप्स सूक्ष्म बोगद्याद्वारे पाईप पुशिंग करून टाकली गेली आहेत.

वडाळा ते रावळी विभागादरम्यान आरसीसी बॉक्स टाकल्यामुळे विद्यमान पुलाच्या जलवाहिनीची क्षमता वाढली आहे. त्याचप्रमाणे टिळक नगर पुलावर जलमार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले असून टिळक नगर स्थानकात आरसीसी बॉक्स टाकल्यामुळे 4.9 मीटर जास्त खुला तयार करण्यात आल्याने जलमार्गाची क्षमता वाढविण्यात आली आहे.

तसेच पनवेल ते कर्जतदरम्यान विद्यमान पुलाला लागून आरसीसी बॉक्स टाकून ब्रिज जलमार्गाच्या वाढीमुळे जलवाहिनीची क्षमता वाढली आहे. जल प्रवाह वाढविण्यासाठी बदलापूर ते वांगणी दरम्यान 1.8 मीटर व्यासाचा पाईप टाकला गेला आहे. लॉकडाऊनचा फायदा घेत मध्य रेल्वेने महत्त्वाच्या वालधुनी पुलाच्या स्टील गर्डरच्या जागी पीएसबी स्लॅबने बदलली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.