ETV Bharat / state

कर्करोगाच्या रुग्णांसाठी मध्य रेल्वे बनली 'तारणहार'

author img

By

Published : Jul 7, 2020, 5:16 PM IST

कर्करोगाच्या रुग्णांना रेल्वेने कोरोनाच्या काळात जीवनदायी औषधे दारापर्यंत पोहचवली. कोरोना महामारीच्या या काळात मध्य रेल्वेने जलदगतीने औषधे पोहोचवून भारतभरात 8 हून अधिक कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा दिला आहे.

कर्करोगाच्या रुग्णांसाठी मध्य रेल्वे बनली तारणहार

मुंबई : आजारी रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक जीवरक्षक औषधे अपारंपरिक मार्गाने पोहोचवण्यात सातत्य ठेवत, कोरोना महामारीच्या या काळात मध्य रेल्वेने जलद गतीने औषधे पोहोचवून भारतभरात 8 हून अधिक कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा दिला आहे.

कर्करोगाच्या रुग्णांना रेल्वेने कोरोनाच्या काळात जीवनदायी औषधे दारापर्यंत पोहचवली. अशाच एका घटनेत त्यांनी बेळगाव येथे ब्लड कँसरच्या रुग्णांसाठी रेल्वेच्या चार वेगवेगळ्या टप्प्यातून मुंबईतून औषध घेऊन ते पोहोचवले आहे. या कोरोना काळात अनेक रुग्ण त्यांच्या घरी अडकून पडले होते आणि कर्करोगाच्या रुग्णांना अत्यावश्यक औषधांची अत्यंत गरज होती. अलीकडेच बेळगाव येथील कर्करोगाच्या दोन रुग्णांना तातडीने मुंबईहून औषधांची आवश्यकता होती. मुंबई ते सोलापूर येथे 24 तासांच्या आत रक्ताच्या कर्करोगाचे औषध पाठवून देण्यासाठी नावलौकिक असलेल्या मुंबईच्या पार्सल शाखेने मुंबईहून बेळगावकडे जाणारी थेट रेल्वे नसल्याने रेल्वे वाहतुकीच्या विविध टप्प्याने औषधे पोहोचविण्याची योजना बनवली. पार्सल बुकिंगनंतर दोन रुग्णांकरता कर्करोगाची औषधे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन ते पुणे येथे विशेष पार्सल रेल्वेने तर पुण्याहून साताऱ्याला कामगारांसाठी असलेल्या विशेष गाडीने गार्डच्या डब्यातून ती नेण्यात आली होती. तिसऱ्या टप्प्यात श्रमिक विशेष गाडीच्या गार्डच्या डब्यातून सातारा येथून मिरजला नेले. चौथ्या टप्प्यात मिरज ते बेळगाव गुड्स रेल्वेमधील गार्डसच्या डब्यातून पोहोचविण्यात आले. या औषधाच्या वाहतुकीचे संपूर्ण समन्वय मुंबई विभाग पार्सल निरीक्षक यांना जाते. शेवटी दोन रुग्णांसाठीचे औषध पाकिटे तीन ट्रान्स-शिपमेंटच्या टप्प्यांनंतर बेळगाव येथे मध्यरात्री 1 वाजता स्थानकातील स्टेशन मॅनेजर यांच्याकडे देण्यात आले.

मध्यरात्री ठाणे मॅनेजरकडून सर्व औपचारिकता पूर्ण केल्यावर, एका 69 वर्षीय रक्ताच्या कर्करोग रुग्णाच्या मुलाने स्टेशन व्यवस्थापकांकडून औपचारिकता पूर्ण केल्यावर औषधे घेताना, “माझ्या वडिलांना या रक्ताच्या कर्करोगाच्या औषधाची तीव्र गरज असताना या कठीण दिवसांत भारतीय रेल्वेने जी सेवा दिली आहे, त्याबद्दल मी शब्दात वर्णन करू शकत नाही. मी भारतीय रेल्वेचा आभारी आहे आणि त्यांनी अशीच सेवा पुढे चालू ठेवली पाहिजे आणि अधिकाधिक जीव वाचवावेत आणि अशाप्रकारच्या त्वरित व समर्पित सेवेने कार्य करावे". असे भाव व्यक्त केले.

बेळगाव येथे आणखी एक स्तनाच्या कर्करोगाचा रुग्ण जी एअरफोर्समध्ये सेवा देणारे जवान कपोल रवी यांच्या 47 वर्षांच्या आईने जलद गतीने रेल्वेमार्गाद्वारे औषध मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ट्वीटरवरून औषधांच्या गरजेच्या अनेक विनंत्या करण्यात आल्या आहेत. एक संजय पात्रो यांनी @railminindia आणि @central_railway वर ट्विट केले आहे की, त्यांचे सासरे आजारी आहेत आणि ओरिसाच्या कोरापटमधील जयपोर येथे आपत्कालीन औषधे तातडीने आवश्यक आहेत. त्यांना बुकिंग झालेली औषधे 01019 कोणार्क एक्सप्रेसने ब्रह्मपूर येथे पाठवून देण्यात आली. पुढे मुंबई विभागातील पार्सलचे मुख्य वाणिज्य निरीक्षक यांनी पूर्व तटीय रेल्वेचे, खुर्दा रोड येथील मुख्य वाणिज्य निरीक्षक प्रदीप सेनापती यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना जयपोर येथे औषधे पाठवून देण्याची सोय करण्याची विनंती केली. हे औषध घेतल्यावर संजय पात्रो आनंदित झाले. कोविडच्या या कठीण काळात रेल्वेने कसे काम केले यांचीही काही उदाहरणे आहेत.

अ. क्रमांक व तारखेपासून हस्तांतरित औषध

१. मुंबई ते ब्रह्मपूर 16.06.2020
२. मुंबई ते बंगळुरू (सिकंदराबाद - चैनईमार्गे) म्हैसूर 20.05.2020
3 मुंबई ते बेळगाव 18.05.2020
४. मुंबई ते बेळगाव 18.05.2020
५. कांजूरमार्ग ते सोलापूर 11.05.2020
६. कळवा ते विन्हेरे (कोकण विभाग ) 06.05.2020
७. परळ ते वैभववाडी 06.05.2020
८. मुलुंड ते गोरखपूर 18.04.2020

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.