ETV Bharat / state

मध्य रेल्वेचा स्वच्छता रथ सुसाट, वर्षभरात १ लाख ६६ हजार घनमीटर कचरा साफ - देशाची आर्थिक राजधानी

देशाची आर्थिक राजधानी आणि मेगासिटी असणार्‍या मुंबईतील अनेक रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळालगत शौचास जाण्याची आणि कचरा फेकणार्‍यांची संख्या मोठी होती. याला आळा घालण्यासाठी रेल्वेने स्थानक परिसर तसेच रेल्वे रुळांभोवतीची स्वच्छता मोहीम रेल्वेने तीव्र केली आहे. गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेवर ( Central Railway ) 1 लाख 66 हजार घनमीटर कचरा विशेष रेल्वे गाडीने ( पाच स्वच्छता रथ ) उचलत एक नवीन विक्रम आपल्या नावाने केला आहे.

रेल्वे
रेल्वे
author img

By

Published : Mar 29, 2022, 9:12 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी आणि मेगासिटी असणार्‍या मुंबईतील अनेक रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळालगत शौचास जाण्याची आणि कचरा फेकणार्‍यांची संख्या मोठी होती. याला आळा घालण्यासाठी रेल्वेने स्थानक परिसर तसेच रेल्वे रुळांभोवतीची स्वच्छता मोहीम रेल्वेने तीव्र केली आहे. गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेवर ( Central Railway ) 1 लाख 66 हजार घनमीटर कचरा विशेष रेल्वे गाडीने ( पाच स्वच्छता रथ ) उचलत एक नवीन विक्रम आपल्या नावाने केला आहे.

1.66 लाख घनमीटर कचरा - लोकल मार्गावरील अस्वच्छता, रुळांवर जमा होणारा कचरा नेहमीच रेल्वेसमोरील आव्हान ठरते. मात्र, गेल्या वर्षभरात रेल्वे विभागाकडून मेल, एक्स्प्रेस, स्थानकातील परिसर, रेल्वे मार्ग, प्रसाधनगृह, रुळांजवळील वसाहती अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. मुंबईतील रेल्वेच्या सर्व मार्गांवर मिळून 75 लाखा पेक्षा जास्त प्रवासी ये-जा करत असून मेल, एक्स्प्रेसमधील प्रवाशांचीही यामध्ये भर पडते. सर्व मार्गांजवळील वसाहतींमधून रुळांवर पडणारा तसेच प्रवासात प्रवाशांकडून रुळांवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याने नाले तुंबण्याची समस्या निर्माण होते. 2021-22 या वर्षात उपनगरीय विभागातील ट्रॅकमधून 1.66 लाख घनमीटर गाळ तथा कचरा साफ करण्यात आला. मुंबई उपनगरीय विभागांमध्ये रविवारी मेगा मेंटेनन्स ब्लॉकचा फायदा घेऊन महत्त्वपूर्ण भाग स्वच्छ करण्यात आला आहे.

पाच स्वच्छता रथ कार्यरत - मध्य रेल्वेच्या ( Central Railway ) उपनगरीय विभागात पाच स्वच्छता रथ कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त, रुळावरील गाळ काढण्यासाठी खुल्या वाघिणीवर बसवलेले एक पोकलेन आणि सहा जेसीबी मशिनही कार्यरत आहेत. प्रामुख्याने, स्वच्छता रथचा वापर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–कल्याण दरम्यान पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूने वसलेल्या झोपड्या तथा झोपडपट्ट्या, डोंबिवली स्टेशन स्लो लोकल लाईनच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने, विक्रोळी, माटुंगा-सायन दरम्यान धोबी घाट, धारावी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–मशीद–सँडहर्स्ट रोड दरम्यानचा भाग अशा ठिकाणी केला गेला. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द दरम्यान रावली जंक्शन, वडाळा आणि किंग्ज सर्कल दरम्यान, माहीम, चेंबूर आणि मानखुर्द दरम्यान, गुरु तेग बहादूर नगर आणि रावली विभाग दरम्यान केला गेला.

हेही वाचा - ड्रग्सची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक; दिंडोशी पोलिसांची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.