ETV Bharat / state

supriya sule : 'बेटी पढाओ, बेटी बचाओ'चा नारा देणारे सरकार बेटीला न्याय देण्यात अपयशी - सुप्रिया सुळे - सरकार बेटीला न्याय देण्यात अपयशी

मुंबई मधील वसतीगृहातील मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्रसरकार आणि राज्यसरकार गंभीर नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

supriya sule
सुप्रिया सुळे
author img

By

Published : Jun 7, 2023, 10:49 PM IST

मुंबई : महिलांचे, मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे व चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य दिलेच पाहिजे. आता तर सातत्याने मुलींच्या किंवा महिलांच्या विरोधात ज्या घटना घडत आहेत, त्याबाबत राज्यसरकार गंभीर नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

वस्तीगृहामध्ये सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे : सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी महिला आणि मुलींचे वसतीगृह असेल त्या ठिकाणी सुरक्षा संदर्भातील सर्व यंत्रणा वापरली गेली पाहिजे. वसतिगृह परिसरात कॅमेरा, योग्य लॉकींग सिस्टीम त्यासोबत मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. देशात मुली आणि महिलांसंदर्भात वारंवार ज्या घटना घडत आहेत, त्यावरून केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे. आता तरी सरकारने वस्तीगृहात अलार्म बेल, कॅमेरे, हेल्पलाइन नंबर आणि मुली महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने पावले उचलावी.

केंद्रसरकारचे गैरव्यवस्थापन : वाढत्या अन्नधान्यांच्या किमती विरोधात गेल्या दोन वर्षांपासून संसदेत सातत्याने आम्ही बोलत आहोत. डाळींचे दर वाढले आहेत. केंद्रसरकार जवळ स्टडी पॉलिसी नसल्याचे दिसत आहे. कांद्याचे उत्पन्न आपल्याकडे जास्त वाढले होते, तेव्हा जगात कांद्याची मागणी होती. त्यावेळेस आम्ही कांदा निर्यात करा असे वारंवार सांगत होतो तसे केले नाही. त्यामुळे कांद्याचे भाव पडल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामध्ये केंद्रसरकारचे सातत्याने गैरव्यवस्थापन दिसून येते आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून सारखे वातावरण दूषित का होते आहे? असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे.

राज्याचे नुकसान होऊ शकते : राज्यात ज्या प्रकारे अहमदनगर घटनेनंतर आता कोल्हापुरातही घटना घडली आहे. तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. अशा प्रकारच्या दंगलीमुळे राज्याचे नुकसान होऊ शकते. स्थानिक लोक घाबरलेली आहेत, तसेच गृहमंत्र्यांचे अपयश दिसत आहे.

बेटी पढाओ, बेटी बचाओ नारा देणारे... : बेटी पढाओ, बेटी बचाओचा नारा देणाऱ्या सरकारला बेटीला न्याय देण्यात अपयश आले आहे. आंदोलनकर्त्या महिलांचे गाऱ्हाने ऐकायला सरकारला वेळ नाही. भाजपा विरोधात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत द्वेष आणि राग निर्माण झाला आहे. आंदोलन करणाऱ्या मुलींवर अन्याय केल्याची चूक भाजपच्या लक्षात आली हे महत्वाचे. देर आये दुरुस्त आये असा टोला सुळे यांनी भाजपला लगावला आहे.

हेही वाचा -

  1. Supriya Sule on Parliament Inauguration संसदेचा उद्घाटन सोहळा हा देशाचा नसून व्यक्तीचा आहे का सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला टोला
  2. Pravin Darekar on Supriya Sule ३ महिन्यात ५५१० मुली बेपत्ता सुप्रिया सुळेंना गृह खात्यावर बोलायचा
  3. Sharad Pawars Retirement पक्षातील अस्वस्थता संपवण्यासाठी निर्णय राजकीय विश्लेषकांचे मत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.