मुंबई - कर्नाटकमधील पोट निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेर फटाके आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी राम नाईक, शायना एमसी आणि राज पुरोहित यांच्यासह भाजप नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राम नाईक म्हणाले, 'आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहला जाईल. पोटनिवडणुकीत १२ जागी विजय मिळवून दिल्याबद्दल आम्ही सर्व जनतेचे आभार मानतो. आज सोनिया गांधींचा जन्मदिवस असल्याने आजचा दिवस काँग्रेससाठी महत्वाचा आहे. आजच्याच दिवशी हा विजय भाजपला मिळाला आहे. त्यामुळे हा भाजपचा काँग्रेसला इशारा आहे'
हेही वाचा - अमित शाह यांच्याकडून नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, विधेयकाच्या बाजूने 293 तर विरोधामध्ये 82 मते
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविषयी बोलताना ते म्हणाले, 'ममता बॅनर्जी यांनी लक्षात ठेवावे की हे जनतंत्र आहे. भारतात जे बिल पास होत आहे, ते लोकांचा हितासाठी आहे. हे बिल लोकांच्या दृष्टीने महत्वाचे आहे.