मुंबई - प्रसुतीगृहातून नवजात मुल चोरी होण्याच्या घटनांना आळा बसावा. तसेच प्रसुतिगृहात डॉक्टर, नर्स, वार्डबॉय यांना होणारी मारहाण थांबावी, म्हणून पालिकेच्या ९ प्रसुतिगृहांमध्ये २१६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
यासाठी पालिका ३ कोटी एक लाख १७ हजार रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
![पालिका रूग्णालयांच्या प्रसुतीगृहात लागणार सीसीटीव्ही](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4192969_bmc-image.jpg)
सीसीटीव्ही लावण्यात येणारी पालिकेची रूग्णालये
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसुतीगृह (विक्रोळी पूर्व)
2) मरोळ प्रसुतीगृह (अंधेरी पूर्व)
3) मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृह (घाटकोपर पश्चिम)
4) स्वार्टर्स कॉलनी म्युनिसिपल प्रसुतीगृह (जोगेश्वरी पूर्व)
5) बी. जी. खेर प्रसुतीगृह (वांद्रे पश्चिम)
6) चारकोप प्रसुतीगृह (कांदिवली पश्चिम)
7) चोक्सी प्रसुतीगृह (मालाड पश्चिम)
8) मालवणी प्रसुतीगृह (मालाड पश्चिम)
9) कस्तुरबा प्रसुतीगृह(बोरिवली पूर्व)