मुंबई: वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अंमली पदार्थ विरोधी विभाग, अर्थात 'एनसीबी'चे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याकडून 2021 ला आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला होता. वानखेडे यांच्यावर विविध आरोप झाल्यानंतर दिल्ली 'एनसीबी'ने हा निर्णय घेतला होता.
-
CBI (Central Bureau of Investigation) registers a case against former Mumbai NCB zonal director Sameer Wankhede and three others in connection with a corruption case related to the Aryan Khan cruise case. The agency raided 29 locations in Mumbai, Delhi, Ranchi (Jharkhand) and… pic.twitter.com/Dw3CDru57q
— ANI (@ANI) May 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">CBI (Central Bureau of Investigation) registers a case against former Mumbai NCB zonal director Sameer Wankhede and three others in connection with a corruption case related to the Aryan Khan cruise case. The agency raided 29 locations in Mumbai, Delhi, Ranchi (Jharkhand) and… pic.twitter.com/Dw3CDru57q
— ANI (@ANI) May 12, 2023CBI (Central Bureau of Investigation) registers a case against former Mumbai NCB zonal director Sameer Wankhede and three others in connection with a corruption case related to the Aryan Khan cruise case. The agency raided 29 locations in Mumbai, Delhi, Ranchi (Jharkhand) and… pic.twitter.com/Dw3CDru57q
— ANI (@ANI) May 12, 2023
वानखेडेंच्या विनंतीवरूनच तपास काढला: आपल्यावर विविध प्रकारचे आरोप होत असल्याने हा तपास आपल्याकडून काढून घेण्यात यावा, अशी आपणच मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे वानखेडे यांचे म्हणणे होते. त्याचप्रमाणे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाबरोबरच तत्कालीन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे प्रकरणही समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आले होते. यावेळी 'एनसीबी'ने समीर वानखेडे यांच्या बेहिशीबी मालमत्तेचा रिपोर्ट 'सीबीआय'ला पाठवला होता. त्या रिपोर्टनुसारच 'सीबीआय'ने आज समीर वानखेडे यांच्या गोरेगाव येथील राहत्या घरी छापेमारी केली. तसेच वानखेडे यांच्यासह चार जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला आहे.
वानखेडेंवर लाच मागण्याचा आरोप: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज ऑन-क्रूझ प्रकरणात अडकवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी 'एनसीबी'चे माजी अधिकारी समीर वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी एफआयआर नोंदवला. त्यांच्या जागेची झडती घेण्यात आली.
आर्यन खान प्रकरण भोवले: केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, समीर वानखेडे यांच्या मुंबई, दिल्ली, रांची (झारखंड) आणि कानपूर (उत्तर प्रदेश) येथे 29 ठिकाणी शोध घेण्यात आला. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यासाठी IRS अधिकारी वानखेडे आणि इतरांनी 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
चेन्नईत झाली होती बदली: सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीआयला माहिती मिळाली की अधिकारी (वानखेडे) आणि त्याच्या साथीदाराने कथितपणे 50 लाख रुपये आगाऊ घेतले आहेत. आर्यन खानच्या अटकेच्या वेळी वानखेडे हे मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख होते. त्यांची गेल्या वर्षी मे महिन्यात चेन्नई येथील डायरेक्टोरेट जनरल ऑफ टॅक्सपेअर सर्व्हिसेसमध्ये बदली करण्यात आली होती.
आर्यन खानवरही केली होती कारवाई: मुंबई 'एनसीबी'ने मुंबईतील समुद्रात कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर २ ऑक्टोबर 2021 या दिवशी छापा टाकला होता. या कारवाईत अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचासह अनेकांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सुरुवातीला अंमली पदार्थ बाळगणे, सेवन करणे आणि तस्करी करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आर्यन खानने 22 दिवस तुरुंगात घालवले त्यानंतर NCB ने त्याला 'पुरेशा पुराव्याअभावी' मे 2022 मध्ये क्लीन चिट दिली. एनसीबी टीम आणि वानखेडे यांच्यावर मोठेपणाचे आरोप होते, त्यामुळे वेगळी दक्षता चौकशी करण्यात आली.
नवाब मलिक यांचे आरोप: मात्र, या कारवाईवर संशय व्यक्त होत 'एनसीबी' मुंबईचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या गंभीर स्वरूपाचे आरोप होण्यास सुरुवात झाली. ही संपूर्ण कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. लोकांना खोट्या प्रकरणात अडकवून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल करण्याची वानखेडे यांची पद्धत असल्याचा गंभीर आरोप तत्कालीन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांचे जात प्रमाणपत्रही खोटे असल्याचा त्यांचा आरोप होता.
हेही वाचा:
- Rahul Narvekar : आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार, पण नार्वेकरांचे काय होणार? काय आहे नवा पेच
- Devendra Fadnavis on Sharad Pawar : 'शरद पवार आणि नैतिकतेचा काही संबंध आहे का?'
- Medicine Diploma Course : ममता बॅनर्जींकडून डॉक्टर बनण्यासाठी 3 वर्षांच्या डिप्लोमा कोर्सचा प्रस्ताव, तज्ञ म्हणाले, गुणवत्तेचे काय?