मुंबई : सर्वात फॅशनेबल दिवाळी पोशाख निवडून आणि कौटुंबिक सोहळ्यात किंवा दिवाळी पार्ट्यांमध्ये जाऊन आपण सर्वोत्कृष्ट दिसावे असे प्रत्येकाला ( Diwali celebration ) वाटते. त्यासाठी स्त्रीया नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यांच्यासाठी आज आम्ही करड्यांचे काही ऑप्शन आणले आहेत. ते पाहूयात, कॅज्यूअल पण स्टायलिश कपडे तुम्हाला नक्कीच आवडतील
कुर्ती आणि प्लाझो ड्रेस : दिवाळीतील सर्वात लोकप्रिय पोशाखांपैकी एक म्हणजे कुर्ती आणि प्लाझो ड्रेस. कंट्रास्टिंग किंवा मॅचिंग प्लाझोची सध्या बाजारात चलती ( casual yet stylish outfits for Diwali ) आहे. तुम्ही सरळ कुर्ती घालू शकता. त्याला हाय हील्स असलेले फूटवेअस चांगली जोड देऊ शकतात. त्यावर हलका मेकअप केल्याच तुम्ही सगळ्यात वेगळे आणि सुंदर दिसू शकता
साडी : साडी ऑलटाईम फेवरेट असते. त्याला जोड म्हणून सध्या स्टायलिश ब्लाउज बाजारात आले आहेत. डिझाईनचे ब्लाउज प्लेन साडीने फॅशनवर वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे जर तुम्हाला साधे आणि फॅशनेबल दिवाळीचे कपडे घालण्याची कल्पना आवडत असेल, स्टायलिश ब्लाउजसह डिझायनर साडी घेऊ शकता.
शरारा ड्रेस : दिवाळीसाठी शरारा ड्रेस हा एक योग्य पर्याय आहे. कारण शरारा सर्वात फॅशनेबल आणि मोहक पोशाखांपैकी एक आहे. दिवाळी म्हणजे चकचकीत आणि झगमगाट असणारे कपडे निवडतात. त्यामुळे शरारा ड्रेस हा तुमचा आवडता पोशाख असू शकतो. त्याला साजेसे दागिने घातले आणि हलका मेकअप केला तरी तुमचा लूक हटके दिसू शकतो.
अनारकली सूट : अनारकली सूट हा पारंपारिक भारतीय फॅशनचे प्रतीक आहे. मध्यंतरी तो लुप्त होत होता. मात्र, अलिकडच्या दशकांमध्ये, त्याने पुनरागमन केले आहे. अनारकली सूट रॉयल आणि पारंपारिक वेशभूषा यांच्यात एक परिपूर्ण मिश्रण राखून ठेवतो. तुम्ही तुमच्या अनारकली ड्रेसला चांगला बनवण्यासाठी जाडसर दागिन्यांसह आणि उंच टाचांच्या सँडल वापरू शकता.