मुंबई : बोगस जात पडताळणी प्रकरण शिवडी न्यायालयाकडून खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात वॉरंट जारी करण्यात आला होता. वारंवार निर्देश देऊनसुद्धा आजही कोर्टात हजर झाले नाहीl. राणा यांच्या वकिलांकडून हजर राहण्यापासून दिलासा मिळावा याकरिता अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांना 1000 रुपयाचा दंड ठोठावला आहे. तसेच त्यांच्या वडिलांविरोधात फरार म्हणून घोषित करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना न्यायालयाने दिले आहे.
कारवाईला स्थगिती देण्याची विनंती : सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर निर्णय येईपर्यंत कारवाईला स्थगिती देण्याची विनंती करीत अर्ज केला होता. या संदर्भात आज पुन्हा राणा यांच्या वकिलांनी म्हटल्यानंतर न्यायालयाने म्हटले आहे की या संदर्भातील कारवाईला स्थगिती देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयातील आणि मुलुंड पोलिसांनकडून करण्यात येत असलेली कारवाई ही दोन्हीही भिन्न आहे. तसेच राणा यांच्या वडिलां संदर्भात पोलिसांनी दिलेले उत्तरावर शिवडी कोर्टाने नाराजी देखील दर्शवली आहे.
दाखला खोटा केल्याचा आरोप : खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात कलम 420, 468, 471 आणि 34 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवनीत आणि हरभजन सिंह, रामसिंग कुंडलेस शिवाय तिचे वडील देखील या प्रकरणात आरोपी आहेत. नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप आहे. अमरावती मतदार संघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा उर्फ नवनीत कौर हरभजन सिंह कुंडलेस आणि तिचे वडील हरभजन सिंह रामसिंग कुंडलेस यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
दंडाधिकारी न्यायालयात कामकाज सुरू : 2021 मध्ये राणाला मुंबई उच्च न्यायालयाने तिचे प्रमाणपत्र फसव्या पद्धतीने मिळविल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर ते सरेंडर करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला होता की अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असलेल्या जागेवर तिला खासदारपदाची निवडणूक लढवता यावी म्हणून फसवणूकीचा दावा करण्यासाठी जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज जाणीवपूर्वक राणाने केला होता. त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. मात्र दोषारोपपत्र दाखल झालेल्या दंडाधिकारी न्यायालयात कामकाज सुरूच होते.
काय आहे प्रकरण : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडिल हरभजन सिंह यांच्यावर मुंबईतील मुलूंड पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. नवनीत राणा यांनी त्यांच्या जातीचा बनावट दाखला दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी शिवडी दंडअधिकारी न्यायालयात खटला चालू आहे. यानंतर राणा आणि त्यांचे वडील यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. जो दंडअधिकारी न्यायालयाने फेटळून लावला आहे. त्यानंतर या निर्णयाला नवनीत राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करत सत्र न्यायालयाने शिवडी न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवून तोच निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हेही वाचा : MP Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांनी जोरदार मारला शॉट अन्....पाहा व्हिडिओ