ETV Bharat / state

औषधांच्या नावावर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या विरोधात सायबर विभागाकडून गुन्हा दाखल - mumbai online medicine scam news

कोरोना काळात रेमेडेसिवीर आणि टोसिलीझूमॅब औषधांचे अधिकृत ऑनलाइन वितरक आहोत असे सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळी विरोधात महाराष्ट्र सायबर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

case registered by cyber department against online  medicine scam
औषधांच्या नावावर फसवणूक करणाऱ्या विरोधात सायबर विभागाकडून गुन्हा दाखल
author img

By

Published : May 13, 2021, 10:14 PM IST

मुंंबई - महाराष्ट्र सायबर विभागाकडून कोरोना काळात रेमेडेसिवीर आणि टोसिलीझूमॅब औषधांचे अधिकृत ऑनलाइन वितरक आहोत, अशी थाप मारुन नागरिकांची गंडवणाऱ्या टोळी विरोधात एका औषध निर्माण करणाऱ्या कंपनीने दिलेल्या तक्रारीवरुन महाराष्ट्र सायबर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार कंपनीच्या नावाने अज्ञात व्यक्तीने कंपनीमध्ये उत्पादित होणाऱ्या रेमडेसिवीर व टोसिलीझूमॅब औषधांचे अधिकृत वितरक आहोत, अशी थाप मारून याबाबत समाज माध्यमावर प्रचार केला. त्यानंतर अनेकांनी त्या खोट्या वितरकाला संपर्क साधल्यानंतर जेवढ्या किंमतीचे औषधे आहेत त्याच्या पन्नास टक्के आगाऊ रक्कम कंपनीच्या बँक खात्यात भरण्यास सांगितले. त्यानंतर पीडितांनी वितरकाने दिलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम भरली. त्यानंतर पैसे भरलेल्यांनी औषधे कधी पोहोचतील याबाबत चौकशी केली असता, दोन दिवसांत पोहोचलतील, कंपनीतून औषधे निघाली आहेत, काही वेळातच औषधे पोहोचतील, अशी कारणे देऊ लागली. पण, औषधे मिळाले नसल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दुसरीकडे समाज माध्यमांवरही काही नागरिक हॅशटॅग वापरून फसवणूक झाल्याचे कंपनीला सांगत आहेत. यावरुन कंपनीने तक्रार दिली आहे.

या सगळ्या तक्रारीमध्ये साम्य असल्याचे निदर्शनास येताच ज्या खात्यात पैसे पाठविण्यात आले आहेत ते खात्याचे व्यवहार थांबण्याचे निर्देश संबंधित बँकेला सायबर विभागाकडून देण्यात आले आहेत. तर, फसवणूक झालेल्यांना ज्या नंबरवरून फोन आले आहेत त्या मोबाईल नंबरचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे.

हेही वाचा - मुंबईत 1 हजार 946 नवे कोरोनाग्रस्त, 68 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.