ETV Bharat / state

लॉकडाऊनच्या काळात मुंबईत 5321 आरोपींवर गुन्हे दाखल, 258 अद्याप फरार - मुंबई पोलीस

राज्यात लॉकडाऊनचा काळ 30 एप्रिलपर्यंत वाढवला गेला असून पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आले आहे. 20 मार्च ते 12 एप्रिल यादरम्यान शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या संदर्भात 2935 गुन्हे दाखल केले असून याव्दारे तब्बल 5321 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात मुंबईत 5321 आरोपींवर गुन्हे दाखल, 258 अद्याप फरार

author img

By

Published : Apr 13, 2020, 4:44 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाय योजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊनचा काळ 30 एप्रिलपर्यंत वाढवला गेला असून पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आले आहे. 20 मार्च ते 12 एप्रिल यादरम्यान शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या संदर्भात 2935 गुन्हे दाखल केले असून याव्दारे तब्बल 5321 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 258 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 1077 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे, तर 3985 आरोपींना जामिनावर सोडून दिले आहे.

गेल्या 24 तासांत मुंबई शहरात कलम 188 नुसार पोलिसांनी तब्बल 199 जणांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल, आस्थापने सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. दक्षिण मुंबईत एकूण 6 जणांवर कारवाई करण्यात आलेली असून मध्य मुंबई 77, पूर्व मुंबईत 42 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. पश्चिम मुंबई 45 व उत्तर मुंबई 29 अशी कारवाई मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.