ETV Bharat / state

Mumbai Crime : मुंबईत परदेशी महिलेवर बलात्कार; अश्लील फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करायचा, गुन्हा दाखल

परदेशी महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी मनीष गांधीविरोधात मुंबईच्या आंबोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

Mumbai Crime
परिदेशी महिलेवर बलात्कार
author img

By

Published : Mar 11, 2023, 10:16 PM IST

Updated : Mar 11, 2023, 10:25 PM IST

मुंबई : शहरातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर येत आहे. परदेशी महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी मनीष गांधीविरोधात मुंबईच्या आंबोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही पोलंडची रहिवासी असल्याची माहिती माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

  • Mumbai: Foreign woman raped, case registered against the accused Manish Gandhi in Mumbai’s Amboli station, police searching for the accused. Case registered under sections of IPC. The victim is a resident of Poland: Mumbai Police

    — ANI (@ANI) March 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आरोपी करायचा ब्लॅकमेल : बलात्कार प्रकरणातील आरोपी मनीष गांधी याने २०१६ ते २०२२ या कालावधीत या परदेशी महिलेवर अनेकदा बलात्कार केला. आरोपीने महिलेचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले. त्या आधारे आरोपी मनीष गांधी महिलेला धमकावायचा आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ​​असे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

जपानी महिलेसोबत गैरवर्तन : दिल्लीमध्ये होळी साजरी केली जात असताना एका जपानी महिलेशी गैरवर्तन केल्याची घटना घडली. होळीच्या दिवशी दिल्लीत एका जपानी महिलेला तरुणांनी रंग लावण्याच्या बहाण्याने गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओत तरुण महिलेच्या शरिराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत समोर आले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरूवात करत तिघांना ताब्यात घेतले आहे.

महिला आयोगाने दिले कारवाईचे आदेश : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही पुरुष एका जपानी महिलेला होळीचे रंग लावत आहेत तसेच तिला त्रास दिला जात आहे. या परदेशी महिलेचा विनयभंग झाला आहे आणि तसेच ती महिला मदतीसाठी ओरडत होती. परिदेशी महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी आम्ही दिल्ली पोलिसांना नोटीस बजावत आहोत. याप्रकरणी दोषींवर कडक करून त्यांना तुरूंगात टाकले जावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.

हेही वाचा : ED interrogation: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांची ईडीकडून चौकशी

Last Updated : Mar 11, 2023, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.