ETV Bharat / state

कर्तुत्त्ववान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, शरद पवारांच्या उपस्थितीत आशिष शेलार यांनी व्यक्त केली इच्छा - ashish shelar

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी पत्रकार विजय चोरमारे यांच्या 'कर्तुत्त्ववान मराठा स्त्रिया' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला आमदार अ‌ॅड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

capable maratha woman should be the chief minister of maharashtra said ashish shelar in mumbai
कर्तुत्त्ववान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, शरद पवारांच्या उपस्थितीत आशिष शेलार यांनी व्यक्त केली इच्छा
author img

By

Published : Nov 20, 2020, 11:40 PM IST

मुंबई- राज्याच्या इतिहासात कर्तुत्त्ववान मराठा स्त्रीया या बऱ्याच झाल्या आहेत, पण राज्याची मुख्यमंत्री मराठा स्त्री झाली नाही. त्यामुळे मराठा स्त्री ही राज्याची मुख्यमंत्री ही व्हावी, अशी इच्छा भाजप नेते अ‌ॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी पत्रकार विजय चोरमारे यांच्या 'कर्तुत्त्ववान मराठा स्त्रिया' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला आमदार अ‌ॅड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. शेलार यांच्या या विधानाचे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

मराठा महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, त्याला मनापासून आमचे समर्थन असेल, असे शेलार यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे होता. तसेच पवार यांच्या उपस्थित हे विधान झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपचे राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापण्याचे प्रयत्न संपलेले नाहीत. तसेच देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होऊ नयेत, असे भाजप नेत्यांना वाटते का, त्याबरोबर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काय होणार, असे प्रश्न शेलार यांच्या वक्तव्याने उभे राहिले आहेत.

शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष होते. मागच्यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीचा धुरा त्यांच्याकडे होती. यावेळी ती अतुल भातखळकर यांच्याकडे देण्यात आली आहे. मूळ कोकणातील मराठा समाजातून आलेले अ‌ॅड. शेलार हे मुंबई महापालिकेतून पुढे आलेले नेते आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधी गटातील मानले जातात. शेलार यांनी आजच्या वक्तव्यातून एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा- पीएनबी बँक घोटाळ्यातील रुपयाचीही नाही वसुली; नीरव मोदीसह मेहुल चोक्सी मोकाट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.