मुंबई - जातीच्या दाखल्याचे नुतनीकरण नसल्याचे कारण सांगत इंडियन कोस्ट गार्डने ४० परीक्षार्थींना परीक्षेला बसू दिले नाही. तटरक्षक दलाच्या यांत्रिक पद भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येत होती. मुंबईच्या वरळीत असलेल्या इंडियन कोस्ट गार्ड कार्यालयात हा प्रकार घडला.
इंडियन कोस्ट गार्ड कार्यालयात विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहेत. बुधवारी यांत्रिक पदाचा पेपर होता. त्यासाठी देशभरातून विद्यार्थी आले होते. त्यापैकी जवळपास ४० विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र जुने असल्याचे कारण देत बाहेर काढण्यात आले.
मुळात जातीचे प्रमाणपत्र एकदाच काढले जाते. त्याची पडताळणी होते. मात्र, त्याचे नूतनीकरण होत नाही. त्यामुळे राज्यभरातून दुरचा प्रवास करून आलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.