मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात झाली. यामध्ये प्रामुख्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच त्यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्याची देखील माहिती आहे.
बैठकीत नगर विकास विभागातर्फे हाताळण्यात येणाऱ्या 1975 शहरी वृक्ष प्राधिकरणसंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करणे, त्यासाठी नियमावली बनवणे, नगर विकास आयोगाची पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे वर्ग करण्यास मान्यता देण्याबाबत प्रस्ताव या मंत्रिमंडळात मंजूर केला जाणार आहे. वृंदावन चॅरिटेबल ट्रस्ट यांना भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या मौजे वस्तवा तालुका अंधेरी येथील जमिनीच्या भाडे अपत्याचे सुधारित दराने नूतनीकरण करणे आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि कलम 27, 75 ,81 व कलम 154 मध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला जाणार आहे.