मुंबई - राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला आजचा मुहूर्त मिळाला असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून मंत्रिमंडळात बड्या नेत्यांना स्थान मिळणार आहे. यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे दिल्लीत गेले आहेत. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळणार असून शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशातच अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली असल्याचे बोलले जात असून अजित पवारांकडे गृह, तर धनंजय मुंडे यांच्याकडे जलसंपदा आणि पाटबंधारे खात्याची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ, तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. सोबतच, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, दत्ता भरणे आणि अदिती तटकरे आदी आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा भव्य शपथविधी सोहळा होणार आज होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी विधान भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या शपथविधीला साधारण 6 हजार लोकांच्या आसनांची तयारी करण्यात आली आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री
- अजित पवार
- दिलीप वळसे पाटील
- अनिल देशमुख
- जितेंद्र आव्हाड
- नवाब मलिक
- हसन मुश्रीफ
- बाळासाहेब पाटील
- धनंजय मुंडे
- राजेश टोपे
- डॉ. राजेंद्र शिंगणे
- दत्ता भरणे
- किरण लहामटे
- शिवसेनेतील मंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार
- रवींद्र वायकर
- सुनील प्रभू
- अॅड अनिल परब
- प्रताप सरनाईक
- डॉ.बालाजी किणीकर
- उदय सामंत
- दीपक केसरकर
- भास्कर जाधव
- संजय राठोड
- आशिष जयस्वाल
- बच्चू कडू ( अपक्ष शिवसेनेला पाठिंबा दिलेले)
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- सुहास कांदे
- अब्दुल सत्तार
- संजय शिरसाठ
- डॉ.संदीपन भुमरे
- राहुल पाटील
- तानाजी सावंत
- शंभूराजे देसाई
- प्रकाश अबिटकर
- महिला आमदारांमध्ये
- डॉ. नीलम गोऱ्हे
- मनीषा कायंदे
- काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची अधिकृत यादी
- अशोक चव्हाण (कॅबिनेट मंत्री)
- के सी पाडवी (कॅबिनेट मंत्री)
- विजय वडेट्टीवार (कॅबिनेट मंत्री)
- अमित देशमुख (कॅबिनेट मंत्री)
- सुनिल केदार (कॅबिनेट मंत्री)
- यशोमती ठाकूर (कॅबिनेट मंत्री)
- वर्षा गायकवाड (कॅबिनेट मंत्री)
- अस्लम शेख (कॅबिनेट मंत्री)
- सतेज पाटील (राज्यमंत्री)
- डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री)