मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांचा आलेख पाहता, राज्यातील शिवसेना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र उरलेल्या आठ मंत्र्यांकडे कोणती खाती येणार याविषयी कयास लावले जात आहे. भाजप शिवसेना राष्ट्रवादी सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या वाट्याला खालील खाते येण्याची शक्यता वर्तविली जातं आहे.
राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारी मंत्रीपदे : अजित पवार - उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण पदाची जबाबदारी येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दिलीप वळसे पाटील - गृहनिर्माण मंत्री, हसन मुश्रीफ - अल्पसंख्यांक मंत्री, धनंजय मुंडे - क्रीडा व युवक कल्याण, अनिल पाटील - पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, धर्मरावबाबा आत्राम - इतर मागास व बहुजन कल्याण, संजय बनसोड - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, अतिदि तटकरे - महिला व बालकल्याण विभागाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळात महिला प्रतिनिधींना महत्त्व : राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर वारंवार मंत्रिमंडळात महिला प्रतिनिधींना महत्त्व दिल्या कारणाने कायमच सरकारला हा विकास आघाडीतील घटक पक्ष लक्ष करत होते. या गोष्टीचा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून आजच्या राजभवनातील शपथविधीत आदिती तटकरे यांना स्थान देऊ विरोधकांच्या तोंड बंद करण्याचं काम केलं आहे.
अजित पवारांना प्रशासनाचा दांडगा : अनुभव राज्यतील शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, महिला अत्याचार वरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. येणाऱ्या आदिवेशनात सरकारला घेरण्याच्या तयारीत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासन हाताळण्याचा दांडगा अनुभव फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे करून घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा - NCP Political Crisis : भावाच्या बंडानंतर बहिणीची पहिली प्रतिक्रिया; एकाच शब्दात दिले उत्तर