मुंबई - येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंगमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. येथील खासगी सुरक्षारक्षकांनी कॅब चालकाला बेदम मारहाण केली व शिवीगाळ देखील केली आहे. याप्रकरणाचा तपास केला असता, मुंबई पोलिसांनी सहा संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-
#WATCH | Cab driver thrashed at Mumbai airport over parking by private security personnel deployed at the airport. 6 people arrested on the basis of the statement by the cab driver: Mumbai Police
— ANI (@ANI) April 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Video confirmed by Police) pic.twitter.com/dWkULFbwsV
">#WATCH | Cab driver thrashed at Mumbai airport over parking by private security personnel deployed at the airport. 6 people arrested on the basis of the statement by the cab driver: Mumbai Police
— ANI (@ANI) April 1, 2023
(Video confirmed by Police) pic.twitter.com/dWkULFbwsV#WATCH | Cab driver thrashed at Mumbai airport over parking by private security personnel deployed at the airport. 6 people arrested on the basis of the statement by the cab driver: Mumbai Police
— ANI (@ANI) April 1, 2023
(Video confirmed by Police) pic.twitter.com/dWkULFbwsV
संशयित आरोपींना अटक - घडलेल्या सर्व प्रकारानंतर कॅब चालकाने थेट पोलीस स्टेशन गाठत याबद्दल तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना लगेच अटक केली आहे, याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या सहा जणांवर आयपीसी कलम १४२, १४३, १४६, १४७, ३२३, ५०४अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. कॅब चालकाच्या तक्रारीवरून गणेश मोहिते, मोहन धोत्रे, किशोर, अनिल ठाकूर, सागर, फातिमा टुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पार्किंगवरून वाद वाढला - मिळालेल्या माहितीनुसार, कॅब चालक देवन देवरे हा पार्किंगमध्ये प्रवाशांची वाट पाहत उभा होता, त्यावेळी एक खासगी महिला सुरक्षा कर्मचारी तिथे आली आणि कार पार्क करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. नंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर अनेक सुरक्षा कर्मचारी त्या ठिकाणी दाखल होऊन त्यांनीही या कॅब चालकाला शिवीगाळ करत दमदाटी देखील केल्याचे समजते.
व्हिडिओ व्हायरल - या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कॅब चालक आणि तेथील खासगी सुरक्षा कर्मचार्यांमध्ये वाद होत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असलेला एक व्यक्ती दिसत आहे. पण काही वेळातच हा वाद हाणामारीपर्यंत वाढला आणि सुरक्षा कर्मचारी कॅब चालकाला मारहाण करू लागतात. मारहाणीचे दृष्य व्हिडिओत कैद झाले आहे.
मध्य प्रदेशातही कॅब चालकाला मारहाण - याआधी शुक्रवारी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये चार जणांनी ओला कॅब चालकाला मारहाण करून त्याचे पाकीट हिसकावले होते. त्यानंतर आज मुंबईतही कॅब चालकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
हेही वाचा - Jalrani Boat : जलराणी बोटीत पाकिस्तानी नव्हतेच, तपासात झाला महत्त्वाचा खुलासा